आमदारांना हवी पुन्हा संधी अन इच्छुकांना हवा नवा चेहरा
पुणे- बारामती लोकसभा मतदार संघात असलेल्या खडकवासला विधानसभा मतदार संघातील भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना या विधानसभेला पुन्हा संधी हवी आहे तर या मतदार संघातील अन्य इच्छुकांना मात्र आता नवा चेहरा पक्षाने द्यावा असे वाटते आहे . भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्यावर इच्छुकांपैकी सुनील मारणे यांनी सांगितले कि ,हि विधानसभा आम्ही २०२४ ला तरी बारामती लोकसभा जिंकू अशा हेतूने आणि त्या दृष्टीने पूर्ण ताकदीने लढणार आहोत जेणेकरून २०२४ च्या बारामती लोकसभेत भाजपला २ लाखाचे मताधिक्य मिळेल अशी रणनीती आखू आणि जनतेच्या अधिक समीप असू तर दुसरे इच्छुक प्रसन्न जगताप यांनी सांगितले कि , खडकवासल्यात फार काळासाठी एखादे घराणे राजकीय दृष्ट्या कायम राहिलेले नाही हा इतिहास आहे , पक्षाने आता नवा चेहरा येथे द्यावा ,जो इच्छुकांपैकी कोणीही असला तरी चालेल पण आता नवा चेहरा देण्याची गरज आहे .
आमदार तापकीर यांनी सांगितले कि ,मला २ वेळा पक्षाने संधी दिली हे खरे आहे पण आपण पाहिले ,२०११ ला कोणाला वाटले नव्हते येथे भाजपचा आमदार निवडून येईल म्हणजे मी निवडून येईल तेव्हा मी निवडून आलो . त्यानंतर २०१४ लाही निवडून आलो .आता पक्ष वाढला आहे,नगरसेवक हि वाढले आहेत ,लोकसभेला या मतदार संघातून मताधिक्य भाजपला मिळालेले आहे , आपण आपल्या कामाबाबत समाधानी आहोत.