पुणे- भारतीय जनता पार्टी पर्वती विधानसभा मतदार संघाच्या वतीने गंगाधाम चौकात भाजपा सदस्य नोंदणी अभियान महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि माजी नगरसेविका वंदना भिमाले यांनी राबविले यावेळी तरुणांसह अनेक वयस्क नागरिकांनी नोंदणीसाठी उत्स्फुर्तपणे गर्दी केली होती .
येत्या राखी पौर्णिमेचे औचीत्य साधून यावेळी वंदना भिमाले यांनी महिला नागरिकांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राख्या पाठविण्यासाठी त्या संकलित करण्याचा कार्यक्रम यावेळी केला. भाजपचे कार्यकर्ते आणि आजी माजी पदाधिकारी यांनी यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आनंद व्यक्त केला .