पुणे- आज भाजपच्या पुणे शहर अध्यक्षपदी पर्वती च्या आमदार माधुरी मिसाळ यांची निवड झाली तर मावळते अध्यक्ष योगेश गोगावले यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली .’माय मराठी’ ने दिलेल्या वृत्तानुसार आज भाजपच्या पदाधिकारी बदलाची नावे अखेर जाहीर झाली .महापालिकेतील स्वीकृत गणेश बिडकर यांची पुणे शहर सरचिटणीस पदी निवड झाली. प्रदेशाध्यक्ष आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी नव्या पदाधिकाऱ्यांची नावे घोषित केली .
भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ. सुभाष भामरे, किरीट सोमय्या, प्रवीण पोटे पाटील, योगेश गोगावले, अशोक कांडलकर
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी काही संघटनात्मक नियुक्त्या केल्या. प्रदेश उपाध्यक्षपदी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री खा. डॉ. सुभाष भामरे (धुळे), माजी उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील (अमरावती), माजी खासदार किरीट सोमय्या (मुंबई), मा. योगेश गोगावले (पुणे) व अशोक कांडलकर (जळगाव) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपा, प्रदेश ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी विकास रासकर तर उपाध्यक्षपदी भूषणसिंह होळकर यांची नियुक्ती केली आहे.
प्रदेशाध्यक्षांनी काही जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या असून त्या पुढीलप्रमाणे – पुणे शहराध्यक्ष आ. माधुरीताई मिसाळ, पुणे शहर सरचिटणीस गणेश बिडकर, जालना जिल्हाध्यक्ष आ. संतोष दानवे, नाशिक शहराध्यक्ष गिरीश पालवे व यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा.
भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्तेपदी माधव भांडारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील माध्यमांच्या संपर्कप्रमुखपदाच्या जबाबदारीसह मा. केशव उपाध्ये यांची सहमुख्य प्रवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त प्रवक्ते पुढीलप्रमाणे – मधु चव्हाण, गिरीश व्यास, गणेश हाके, शिरिष बोराळकर, विश्वास पाठक, अतुल शाह, अर्चना डेहणकर, शिवराय कुलकर्णी, भालचंद्र शिरसाट, श्वेता शालिनी, इजाज देशमुख, सुनील नेरळकर.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
अन्य काही जबाबदाऱ्यांमध्ये गुंतल्यामुळे व वैयक्तिक कारणांमुळे पुढील पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे – प्रदेश उपाध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आर. सी. पाटील व रमेश कुथे, प्रदेश सरचिटणीस डॉ. संजय कुटे, अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्धीकी, ओबीसी मोर्चा अध्यक्ष विजय चौधरी, कामगार आघाडी संयोजक संजय केणेकर व व्यापारी आघाडी दिलीप कंदकुर्ते.
माधुरी मिसाळ यांचा परिचय –
माधुरी सतीश मिसाळ
शिक्षण : बी. कॉम.
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सतीश मिसाळ यांच्या पत्नी
स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा देणाऱ्या क्रांतिकारक केशवराव देशपांडे यांची नात
सन २००७ पुणे महापालिकेवर महात्मा फुले मंडई वॉर्डातून नगरसेविका म्हणून निवड
सन २००९ पर्वती विधानसभा मतदारसंघातून आमदार
सन २०१४ पर्वती विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार (राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य)
सन २०१७ पुणे महापालिकेत भाजपची सत्ता स्थापन करण्यात महत्त्वाचा वाटा (पर्वतीतून २५ नगरसेवक)
चिटणीस, महाराष्ट्र प्रदेश भाजपा
संयोजिका, बेटी बचाव, बेटी पढाओ अभियान
सन २०१४ पुणे लोकसभा प्रभारी
सन २०१९ बारामती लोकसभा प्रभारी
माजी सदस्या, महिला आणि बालकल्याण समिती, महाराष्ट्र राज्य
माजी सदस्या, लोकलेखा समिती, महाराष्ट्र राज्य
सदस्या, सार्वजनिक उपक्रम समिती, महाराष्ट्र राज्य
माजी अध्यक्षा, विद्या सहकारी बँक लिमिटेड
संचालिका, उद्यम सहकारी बँक लिमिटेड
अध्यक्षा, सतीश धोंडिबा मिसाळ प्रतिष्ठान
- भाजप हा जगातील सर्वाधिक सदस्य असलेला पक्ष आहे. भाजपच्या पुणे शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी मोठी आहे. पुणे शहर भाजपची मी पहिली महिला अध्यक्षा आहे याचा मला विशेष आनंद होत आहे. पुणे शहरातील पक्षाचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन. त्यासाठी पक्षाचा विचार आणि शासनाच्या विकासाभिमुख योजनांचा अधिकाधिक प्रसार करण्यावर भर देणार आहे. आगामी काळात पक्षाने माझ्यावर टाकलेली लोकप्रतिनिधी आणि संघटनात्मक अशी दुहेरी जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडीन असा विश्वास व्यक्त करते.
- -आमदार माधुरी मिसाळ