पुणे- पुणे महापालीकाहद्दीत जन्मास येणाऱ्या व मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांचे जन्म आणि मृत्यूचे दाखले त्वरित मिळावे अशी मागणी भाजपचे नगरसेवक प्रवीण चोरबेले यांनी केली आहे. महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांना दिलेल्या निवेदनात चोरबेले यांनी म्हटले आहे कि,पुणे महापालिकेच्या वतीने यापूर्वी जन्मास आलेले नवोदित बालके आणि मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नोंद त्याच्या जन्म आणि मृत्यूनंतर २१ दिवसांच्या आत होत असे परंतु गेल्या काही दिवसापासून हि यंत्रणा ठप्प झाली आहे. नागरिकांना त्यामुळे अनेक शासकीय योजना ,वैद्यकीय सहाय्य ,शैक्षणिक प्रवेश या बाबत अडचणी येत आहे हि योजना पूर्ववत सुरु करण्यात यावी अशी मागणी चोरबेले यांनी पत्रात केली आहे