पुणे- बावधन चा मुख्य रस्ता असलेल्या चांदणी चौक ते रामनगर कॉलनी या रस्त्याच्या रुंदीकरण कामाचे भूमिपूजन आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड चे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले .स्थानिक नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या प्रयत्नातून होत असलेल्या या कामाच्या प्रसंगी वेडेपाटील यांनी सुरु केलेल्या लोकसेवा रथ योजनेचा हि शुभारंभ यावेळी आ.पाटील यांच्या हस्ते करण्यात आला .
किरण दगडे पा. ,श्रद्धा प्रभुणे ,अल्पना वर्पे ,पुनीत जोशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना आ. पाटील म्हणाले कि, रस्त्याची रुंदीकरणे ,पदपथ ,वृक्षारोपण, पाणीपुरवठा ,ड्रेनेज समस्या अशा विविध कामासाठी वेडेपाटील आणि त्यांचे सहकारी नगरसेवक झटून काम करीत आहेत . येथील नागरिक हि या कामांचे कौतुक करत आहेत. महापालिका स्तरावर हि मुलभूत गरजांपासून ते मोठ मोठ्या प्रकल्पांपर्यंत कामे होत आहेत . या नगरसेवकांसह पदाधिकारी चांगले काम करत आहेत. आता याबरोबर लोकांना ,म्हणजे प्रत्येक व्यक्तीला थेट फायदा होईल अशा असंख्य योजना केंद्र सरकार राबवीत आहे.ज्या लोकांना ठाऊक सुद्धा नाहीत. या योजना थेट लोकांपर्यंत कशा पोहोचविता येतील या साठी शहरातील सर्वच नगरसेवकांनी प्रयत्न सुरु ठेवले पाहिजेत .वेडेपाटील यांनी यावेळी केलेल्या प्रास्ताविकात आपण या प्रभागात केलेल्या कामांची जंत्री कथन केली. कोणतेही काम शिल्लक राहू नये, रुंदीकरणात बाधित होत असलेल्या प्रत्येकाला त्याचा समाधानकारक मोबदला मिळावा या साठी आपण सदैव प्रयत्नशील आहोत . आज सुरु केलेल्या लोकसेवा योजनेत संपर्क करतील नागरिक ,जिथे समस्या असेल तिथे हा कार्यकर्त्यांचा रथ जाईल आणि थेट नागरिकांच्या समस्या सोडवून माघारी येईल.