पुणे -संपूर्ण देशात कोरोनाने डोकं बाहेर काढले असून पुणे शहरात अत्यंत विधारक परिस्थिती आहे. पुण्याच्या नागरिकांना ऑक्सिजन मिळत नाही ,रेमडीसीवीर नाही,बेड मिळत नाही,लशीही मिळत नाही. नागरिकांना जीव वाचवण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पुणे शहराचे खासदार या नात्याने याकडे लक्ष देणे तुमची जबाबदारी नाही का? अश्या संकट काळात भाऊ तुम्ही का गप्प असा सवाल पुणे महानगरपालिकेचे गटनेते आबा बागुल यांनी पुण्याच्या खासदारांना विचारला.
पुणेकरांशी नाळ जोडलेला नेता म्हणून तुमची ओळख असून सर्व पक्षीय तुमच्यावर भाजप म्हणून प्रेम करत नसून पुणेकर म्हणून प्रेम करतात. पुण्याचे खासदार म्हणून तुमच्यावर फार मोठी जबाबदारी असून अश्या संकट काळात पुणेकरांच्या तुमच्या कडून खूप अपेक्षा असताना तुम्ही गप्प का? कोणाच्या दबावाखाली तुम्ही गप्प आहेत. याचा खुलासा पुणेकरांपुढे करावा अशी मागणी आबा बागुल यांनी केली.