मुंबई/पुणे, १४ जून २०२२: भारतात पेट्रोलियम उद्योगक्षेत्रातील एक आघाडीची कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (बीपीसीएल) आज त्यांच्या पुणे कार्यालयात रक्तदान मोहिमेचे आयोजन केले होते. जागतिक रक्तदाता दिनानिमित्त सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहयोगाने बीपीसीएलने हा उपक्रम राबवला.
समाजोपयोगी कामे करण्याची आणि समुदायांच्या कल्याणासाठी उपयोगी पडण्याची आपली वचनबद्धता अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने बीपीसीएलने हा उपक्रम हाती घेतला होता. या रक्तदान मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, डीलर्स, वितरक आणि चॅनेल पार्टनर्स यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली चार बेड्स व सर्व आवश्यक उपकरणांची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी एकूण ५२ युनिट्स रक्त जमा करण्यात आले. प्रत्येक रक्तदात्याला रुग्णालयाकडून एक प्रमाणपत्र देण्यात आले.
उपक्रमाबाबत प्रतिक्रिया नोंदवताना भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे एक कर्मचारी, महाराष्ट्र आणि पुणे – स्टेट हेड (आयअँडसी) श्री. तन्मय जैसवाल म्हणाले, “बीपीसीएलच्या सिद्धांतांचे पालन करत मी गेली ३० वर्षे सातत्याने रक्तदान करत आहे. समाजाचे ऋण फेडण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याची भावना जागृत ठेवणाऱ्या अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये सहभागी होताना मला अतिशय अभिमान वाटतो. रक्तदान करण्याची आजची माझी ३९वी खेप आहे आणि भविष्यात देखील मी रक्तदान करत राहीन व जितके शक्य होईल तितक्या जास्त लोकांच्या उपयोगी पडण्याचा प्रयत्न करेन.”
ते पुढे म्हणाले, “एका वेळेचा कार्यक्रम म्हणून रक्तदानाची सुरुवात झाली आणि माझ्या मनावर त्याचा इतका सखोल परिणाम झाला की आज रक्तदान हा माझ्या जीवनाचा एक भाग बनला आहे. मी, माझे आणि स्वतः यांच्या पलीकडे जाऊन काहीतरी करण्याच्या आंतरिक उर्मीने हे सर्व घडत गेले. आज मी मानतो की जो समाज आपल्याला घडवतो, इतके काही देतो त्याचे थोडेतरी ऋण फेडण्याचा हा एक मार्ग आहे. रक्तदान म्हणजे तुम्ही तुमचे, तुमच्यातले काढून इतरांना देता, त्यामुळे परोपकाराचा सर्वोच्च मार्ग म्हणून रक्तदानाकडे पाहिले जाते, त्यामुळे आपण सर्वांनी रक्तदान केले पाहिजे.”
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अशा प्रकारच्या स्वैच्छिक रक्तदान शिबिरांचे आयोजन दरवर्षी करते. अतिशय महत्त्वाच्या आणि गरजेच्या आरोग्य शिबिरांचे आयोजन देशभरात करण्यात ही कंपनी आघाडीवर आहे.