पुणे – आज खासदार गिरीश बापट आणि शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी शहरातील कोरोना संदर्भात अजित पवार तसेच राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाला टीकेचे लक्ष करून आंदोलनाची घोषणा केल्यानंतर शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे यांनी बापटांवर जोरदार टीका केली आहे. केंद्रात तुम्ही खासदार आहात तुम्ही काय केले ? साडेसहा हजार कोटीचे बजेट असलेल्या महापालिकेत तुमची सत्ता आहे तुमच्या महापौरांनी काय केले ते सांगा असा सवाल करत बापट म्हणजे काय ,’ खोटे बोल पण रेटून बोल ‘ असा प्रकार असल्याचे ते म्हणाले .निव्वळ फेसबुक आणि व्हाटस एप वरून चमकून जनतेच्या अडचणी दूर होत नाहीत आणि आता आंदोलने कसली करताय, जनतेच्या सेवेसाठी तत्परता दाखवा आणि संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी एकत्र काम करा असे ते म्हणाले . नेमके बागवे काय म्हणाले ते ऐका त्यांच्याच शब्दात …