जवानांसाठी पत्ररुपी राखीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे-अमित बागुल मित्र परिवारातर्फे राखीपोर्णिमेनिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येतात त्यामध्ये पोलीस बांधवांना रक्षण राखी, झाडांना वृक्षवल्ली राखी,एडसग्रस्त मुलींसोबत राखी,अंध बांधवांसोबत राखी हे उपक्रम गेल्या १० वर्षांपासून आयोजित करीत असून यंदाच्या वर्षी बंध नात्याचे,वचन रक्षणाचे या संकल्पने अंतर्गत भारतीय लष्करातील जवान आपल्या प्राणाची तमा न बाळगता, आपली सुख दुःख, कोणतेही सण साजरे न करता भारतीय सीमांचे रक्षण करतात,सर्व भारतीयांना आपल्या कार्याचा सार्थ अभिमान आहे हा विश्वास देण्यासाठी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागरिकांना या उपक्रमात सहभागी होऊन राख्या तयार करून व पत्ररूपी राखी आपल्या सैनिकांप्रती असलेल्या भावना व्यक्त करून आमचे कार्यालय ओटा नं १२ शिवदर्शन पुणे येथे दिनांक १०/०८/२०१९ पर्यंत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पुणे शहराच्या विविध भागातून नागरिक,पुणे महानगरपालिकेच्या शाळा,खासगी शाळा व संस्था सहभागी होत असून आज जैन इंटरनॅशनल सोशल नारी संघटन या संस्थेने १००० राख्या व पुणे महानगरपालिकेच्या कै . केशवराव जेधे प्राथमिक विद्यालय शाळा क्र १६ या शाळेने ४०० राख्या व पत्र जमा केले. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमचे कार्यालयात आपण तयार केलेल्या राख्या व पत्र आणून द्याव्यात सर्व राख्या सीमेवर तैनात सैनिकांना पोहचवण्यात येणार आहेत. यावेळी मा.विजयाताई हरिहर,अमित बागुल,मुख्याध्यापिका ज्योती मानकर,शिक्षिका सौ देवकर,सागर आरोळे,महेश ढवळे ,अभिजित गायकवाड ,भाऊसाहेब दोडके, गोरख मरळ, इम्तियाझ तांबोळी,अभिषेक बागुल,विश्वास दिघे,इमाम हनुरे,राम रणपिसे आदी उपस्थित होते.