पुणे-कोथरूडमधील सहजानंद सोसायटीजवळ दारू पिण्यास बसलेल्या युवकांना जाब विचारला म्हणून चौघाजणांनी विलास कोल्हे आणि राहुल कोल्हे यांच्यावर हल्ला केला. बाहेर काहीतरी झाल्याचे समजताच तेथेच राहावयास असलेल्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि काय झाले म्हणून विचारणा केली. तेव्हा या गुंडांनी त्यांना ही धक्काबुक्की केली. यामध्ये त्यांच्या हाताच्या बोटांना दुखापत झाली. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर 354 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.माजी आमदार कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील नागरिकांना दारूड्यांचा मोठा त्रास होत आहे. पोलिसांत तक्रार दिल्यानंतरही दखल घेतली जात नाही. आजच्या घटने संदर्भात पोलिसांना कळवल्यानंतरही ते लवकर आले नाहीत. दरम्यान कोथरूड पोलिस ठाण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी महापौर मुरलीधर मोहोळ आणि नागरिकांसोबत बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये पोलिस व्यस्त होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.