पुणे-महापौरांच्या दालनात आपल्याला झालेली मारहाण हा प्रकार कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी चिथावणी दिल्यामुळेच झाला असा आरोप आज सकाळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी केला .
महापालिकेच्या अधिकारी कर्मचारी वर्गाने आज मनप हिरवळीवर मोठ्या संख्ये जमून या प्रकरणी निषेध सभेचे आयोजन केले होते तत्पूर्वी माध्यमांच्या प्रश्नांना अतिरिक्त आयुक्त निंबाळकर यांनी उत्तरे दिली यावेळी ते म्हणाले ,
25 कोटीची निविदा काढली हि बातमीच चुकीची आहे,ती देणाऱ्या संबधित पत्रकाराला आपल्याकडून व्यवस्थित माहिती करून घ्या असे सांगितले होते .पूर्वी कायम खर्च करूनही १०० टक्के संपूर्ण जलपर्णी निघत नसे ,कायम तलाव जलपर्णी मुक्त रहावा या हेतूने प्रभावी अंमलबजावणी व्हावी या हेतूने प्रस्ताव मागविले होते . यात जलपर्णी राहिली दिसली तर दंड आकारणी चीही तरतूद राहील याची कल्पना देवूनच प्रस्ताव मागविले . उद्या कोणी कितीही रकमेच्या खर्चाचा प्रस्ताव देऊ शकते ,त्यावर आम्ही काही करू शकत नाही. पण अशा आक्षेपार्ह प्रस्तावावर आम्ही काही कार्यवाही केली ,सह्या केल्या तर आम्ही दोषी ठरू ,पण असे काहीही केलेले नाही.उलट 29 जानेवारीलाच असा प्रस्ताव आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतला .त्यांना खात्री असती कि यात गैरप्रकार झालाय तर त्यांना अन्य मार्ग होते ,पण गोंधळ घालून ,अधिकाऱ्यांना दमदाटी करून भडकपणा निवडणुकीच्या अनुषंगाने करणे यावर त्यांनी भर दिला .योग्य कामाबद्दल जरूर संघर्ष करावा पण बेछूट आरोप करत आधिकाऱ्यांना चोर ,भ्रष्टाचारी म्हटल्यास कोण ऐकून घेईल . तरीही प्रत्युत्तर देताना मी त्यांना आहो ,जाहो घालूनच बोललो पण अरविंद शिंदे यांनी चिथावणी दिली एकेरी भाषा केली .चप्पल फेकून मारणे,शिवीगाळ करणे असे प्रकार झाले . कालच त्यांनी लेखी माफी मागितली असती तर या प्रकरणावर पडदा पडला असता .अखेर मी पोलिसात तक्रार केली.त्यांच्यावर सामान्य माणसावर होते त्याप्रमाणेच कायदेशीर कारवाई व्हावी अशीच माझी मागणी आहे .