पुणे दि.26 : माल वाहतूक, टुरिस्ट टॅक्सी, बस व ॲम्बुलन्स या वाहनांसाठी सुरु होणाऱ्या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक शुल्क भरुन राखून ठेवण्याकरिता आगाऊ अर्ज करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी केले आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लवकरच या वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. ज्यांना खाजगी चारचाकी वाहनांना हवा असणारा आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरुन हवा असेल त्यांनी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. हा अर्ज आणि धनाकर्ष (डीडी) 28 जुलै 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2.30 दरम्यान कार्यालयाच्या परिवहन विभागात पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह स्वतः जमा करणे आवश्यक राहील.
एकाच क्रमांकाकरिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी 29 जुलै 2022 रोजी सकाळी 10.30 नंतर कार्यालयीन सूचनाफलकावर लावण्यात येईल. या अर्जासाठी 29 जुलै रोजी 4.30 वाजता लिलाव करण्यात येणार आहे.
मालवाहू, टुरिस्ट टॅक्सी, बस व अॅम्ब्युलन्स संवर्गातील वाहनांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असतील त्यांनी 29 जुलै 2022 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते दुपारी 2.30 या वेळेत विहित नमुन्यातील अर्ज परिवहन विभागात जमा करणे आवश्क आहे. यामध्ये एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता कार्यालयीन नोटीसबोर्डवर लावण्यात येईल. अर्जांसाठी त्याच दिवशी दुपारी 4.30 वाजता परिवहन विभागात लिलाव होणार आहे.
धनादेश ‘आर.टी.ओ.,पुणे’ या नावाने राष्ट्रीयकृत किंवा अनुसूचित बँकेचा पुणे येथील असावा. त्यासोबत पॅनकार्डची साक्षांकित प्रत जोडणे गरजेचे आहे. लिलावासाठी जमा करण्यात येणारा धनादेश हा एकाच सीलबंद पाकीटात जमा करावा.
एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व भरलेले शुल्क शासनाच्या तिजोरीत जमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत करण्यात येणार नाही, असेही कळविण्यात आले आहे.