पुणे-पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत प्रवाशांच्या सोयीसाठी निवारा बसशेल्टर्स उभारण्यात आलेली आहेत. परंतु
या बसशेल्टर्स वर वाढदिवसाचे फलक, राजकीय जाहिराती तसेच हॅण्डबिल्स अनधिकृतपणे लावण्यात येतात. यामुळे या
बसशेल्टर्सचे विद्रुपीकरण होत आहे.पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस थांब्यांवर अनधिकृत जाहिराती लावून महामंडळाच्या बस थांब्यांचेविद्रुपीकरण करणाऱ्या व्यक्ती, कंपनी व संस्था यांच्या विरुद्ध वेळोवेळी पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पुणेमहानगर परिवहन महामंडळाकडून विविध पोलीस स्टेशन मध्ये महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम १९९५अन्वये कलम ५ (प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेन्ट ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट) नुसार गुन्हे दाखल करण्यात येतात. मात्र तरीही अशाप्रकारच्या अनधिकृत जाहिराती व फलक बसेस व बसशेल्टर्सवर लावण्यात येत आहेत.
या अनधिकृत जाहिरातींमुळे बस थांब्यांचे विद्रुपीकरण होऊन बस थांब्यांवर प्रवाशांच्या सोयीसाठी लावलेली बसमार्ग
व वेळापत्रकाची माहिती प्रवाशांना दिसत नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. तरी पुणे महानगर परिवहन महामंडळाची
परवानगी न घेता बसशेल्टर्स व बसेस वर अनधिकृत जाहिराती लावण्यात येवू नयेत, असे आवाहन परिवहन महामंडळाकडून
करण्यात आले आहे.