पुणे- मुंबईत मुख्यमंत्री पदाची शपथ सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेताच हडपसर आणि परिसरात शिवसेनेचे नगरसेवक नाना भानगिरे आणि मित्र परिवाराने नागरिकांना पेढे वाटप करीत मोठा आनंदोत्सव साजरा केला .हडपसर ,गाडीतळ ,कोंढवा ,वानवडी,आदी परिसरात सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला विशेष म्हणजे महिला कार्यकर्त्या देखील रस्त्यावर येवून पेढे वाटप करताना दिसत होत्या .