रोचित अकादमीतर्फे’हरसिंगार’ मैफल
पुणे. ता. ९: रोचित कथक अकादमीतर्फे ‘हरसिंगार’ या दृक्-श्राव्य मैफलीचे येत्या शुक्रवारी (दि.१३) आयोजन करण्यात आले आहे. ज्योत्स्ना भोळे सभागृह येथे सायंकाळी ६.१५ वाजता हा कार्यक्रम पार पडेल.
भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री शृंगार अथवा नायिका शृंगाराचा अनेक पैलूंनी विचार झाला आहे. केवळ सौंदर्य लक्षण नव्हे तर स्त्रीच्या शृंगाराचा थेट संबंध नायिका म्हणून असणाऱ्या तिच्या अनेक अवस्थेशी निगडित आहे.
या मैफलीतून नायिका भेद व संयोग-वियोग शृंगारातून साकारलेली मांडणी गुरु रोशन दाते यांच्या शिष्या रसिकांसमोर मांडतील. तर गुरु रोशन दाते आणि प्रसिद्ध वादक व संगीत दिग्दर्शक चैतन्य कुंटे शब्द-सूरातून या नायिकांचे शृंगारपैलू उलगडतील. अकादमीच्या ४० व्या वर्षपूर्तीनिमित्त वर्षभर सुरू असलेल्या ‘पारितोष ‘ या शृंखलेतील ‘हरसिंगार’ ही नृत्यरचना असून मूर्तिशिल्प व भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक दिवंगत उदयन इंदूरकर यांना ही मैफल समर्पित असेल.