एलन पुणे येथे पोस्टर आणि पुस्तिकेचे प्रकाशन
पुणे. टॅलेंटेक्स 2023, एलन करिअर इन्स्टिट्यूटने विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा जाहीर केली आहे. एलन पुणे येथे पोस्टर आणि पुस्तिकेचे प्रकाशन करताना ही घोषणा करण्यात आली. कार्यक्रमाला एलन पुणेचे केंद्रप्रमुख अरुण जैन व इतर वरिष्ठ प्राध्यापक उपस्थित होते.
अरुण जैन म्हणाले की, देशातील हुशार विद्यार्थ्यांना पुढे आणण्यासाठी, त्यांचे करिअर वाढवण्यासाठी टॅलेंटेक्स हे सर्वात शक्तिशाली व्यासपीठ आहे. या परीक्षेत बसून विद्यार्थी कोचिंग फीमध्ये सवलत मिळवून त्यांची स्वप्ने पूर्ण करू शकतात. एलन टॅलेंटेक्स-2023 च्या घोषणेसह, देशभरातील विद्यार्थ्यांनी टॅलेंटेक्स साठी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी टेलेंटेक्स
परीक्षा एकाच टप्प्यात ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
परीक्षा 9 ते 16 ऑक्टोबर दरम्यान झोननिहाय असेल.
09 ऑक्टोबर रोजी पुण्यात परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. देशातील हुशार विद्यार्थ्यांना पुढे आणण्यासाठी टॅलेंटेक्स हे एक उत्तम व्यासपीठ आहे, ज्यामध्ये इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. टॅलेंटेक्समध्ये राष्ट्रीय आणि राज्य श्रेणीतील विद्यार्थ्यांना 250 कोटी रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती दिली जाईल. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र स्पर्धात्मक यश निर्देशांक देखील जारी केला जाईल. 2022 पर्यंत सुमारे 10 लाख विद्यार्थी टॅलेंटेक्समध्ये सामील झाले आहेत.
ते विद्यार्थी देखील परीक्षेला बसू शकतात ज्यांनी एलनच्या क्लासरूम प्रोग्राम मध्ये प्रवेश घेतला आहे. देशातील कोणत्याही एलन केंद्रात प्रवेश घेता येतो. विद्यार्थ्यांना ूूwww.tallentex.com या संकेतस्थळावर वर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरून नोंदणी करावी लागेल. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून ऑफलाइन फॉर्म उपलब्ध होतील. परीक्षा आणि पारितोषिक वितरणाचा निकाल नोव्हेंबर महिन्यात सक्सेस पॉवर सत्रात जाहीर केला जाईल.
स्पर्धात्मक यशाचा निर्देशांक मिळेल
टॅलेंटेक्स मध्ये सामील होणाÚ़्या विद्यार्थ्यांना दुहेरी लाभाच्या रूपात स्पर्धात्मक यश निर्देशांक दिला जाईल. या इंडेक्सद्वारे, विद्यार्थ्याने जर जेईई, नीट, केव्हीपीवाय किंवा एनटीएसई, सीए आणि सीएस सारख्या परीक्षा दिल्या तर त्याचे राष्ट्रीय रँकिंग किती येईल हे जाणून घेऊ शकतो. तो सी.एस.आय निकालाच्या घोषणेसह प्रसिद्ध केला जाईल.
टॅलेंटेक्स उपयुक्त का आहे?
एलन ची टॅलेंटेक्स देशातील सर्वात मोठी टॅलेंट हंट परीक्षा आहे. या परीक्षेत बसणे विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारे उपयुक्त ठरेल. ही चाचणी विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक उत्कृष्टतेचे विश्लेषण करण्यास मदत करते. लाखो विद्यार्थ्यांसोबत निष्पक्ष स्पर्धेद्वारे प्रत्येक विद्यार्थी आपली क्षमता तपासू शकतो. यासोबतच टॅलेंटच्या आधारे शिष्यवृत्ती आणि रोख बक्षिसेही उपलब्ध आहेत, जे करिअर घडवण्यासाठी उपयुक्त आहेत.
खालीलप्रमाणे टॅलेंटेक्स साठी नोंदणी करू शकता :
टॅलेंटेक्समध्ये नोंदणी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने करता येते. नोंदणी www.tallentex.com या संकेतस्थळावर भेट देऊन करता येईल. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून ऑफलाइन नोंदणीसाठी, फॉर्म शाळा आणि जवळच्या एलन केंद्रांवर भरता येईल.
सराव पेपर विनामूल्य :
टॅलेंटेक्स मध्ये नोंदणीसोबतच विद्यार्थ्यांना सरावासाठी चाचणी प्रश्नावली संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जातील, जेणेकरून ते परीक्षेची पातळी समजून घेऊन परीक्षेची तयारी करू शकतील. परीक्षेचा अभ्यासक्रम एनसीईआरटीचा असेल. परीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रमाची माहितीही वेबसाइटवर उपलब्ध आहे.
खालील प्रकारे परीक्षेचे स्वरूप असेलः
ही परीक्षा दोन तासांची असेल, ज्यामध्ये बहुपर्यायी आणि पूर्णांक प्रकारचे प्रश्न असतील. ज्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र आणि तार्किक मानसिक क्षमता या विषयांचे प्रश्न विचारले जातील. हा पेपर एनसीईआरटी च्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. परीक्षेच्या आधारे सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना 1.25 कोटी रुपयांचे रोख पारितोषिक आणि 250 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.