पॉझिटिव्ह चे प्रमाण ५ च्या आत असेल तरच हे होणार ..पुढे गेले कि मग नाही ..
पिंपरी चिंचवडचा पॉझिटिव्ह प्रमाण ५ च्या आत नाही तिथे त्यामुळे परवानगी नाही
सिनेमागृहे ,नाट्यगृहे बंदच -पुढच्या आठवड्यात त्याबाबत निर्णय घेणार
पुणे-सोमवारपासून पुण्यातील मॉल्स,सर्व दुकाने रात्री सात वाजेपर्यंत खुली राहतील. याशिवाय हॉटेल रेस्टॉरंट रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहतील .सोमवारपासून अभ्यासिका, वाचनालय सुरु करण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे.अशी माहिती आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांना येथे दिली .
पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट पाचच्या खाली आला आहे. त्यामुळे प्रशासनाने लगेच निर्बंध बदलले असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असेही अजित पवार यांनी सांगितले. अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील कौन्सिल हॉल इथे कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीला प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. शहर अनलॉक केल्यानंतर ही पहिली बैठक होती.
पुणे शहरात आता दुकाने संध्याकाळी ७ पर्यंत उघडी राहणार आहेत. या बरोबरच हॉटेलदेखील रात्री १० पर्यंत सुरू राहतील. थिएटर तसेच हॉल ५०% क्षमतेने सुरू राहतील. तसेच अभ्यासिका ग्रंथालये देखील ५०% क्षमतेने सुरू ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.
सोमवारी १४ तारखेपासून या नवीन नियमांची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. ‘पुढील दोन दिवस पॉझिटिव्हिटी रेट किती आहे हे पाहिलं जाईल. त्यानंतर जर हाच ट्रेण्ड कायम राहिला तर सोमवार पासून नवीन आदेशांची अंमलबजावणी होईल.
महापालिकेने असे केले आहेत नवे नियम
– अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने आठवड्याचे सर्व दिवस सायंकाळी सात पर्यंत खुली राहतील.
– अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी सात पर्यत खुली असतील
– अभ्यासिका, ग्रंथालय ५० टक्के क्षमतेने सुरू होणार
– सार्वजनिक वाचनालये सुरू होणार
– कोचिंग क्लासेस प्रशिक्षण संस्था आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू होणार
– मॉल ५० टक्के क्षमतेने सुरू होणार
– व्यायामशाळा, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा, क्षमतेच्या ५० टक्के आठवड्याचे सर्व दिवस सुरू राहणार
– कृषी संबंधित दुकाने, आस्थापना, कृषी उत्पन्न बाजार समिती, शेतमाल विक्री सुरू राहणार
– रेस्टॉरंट, बार, हॉटेल रात्री १० पर्यंत आसनक्षमतेच्या ५० टक्केने सुरू होणार
– महापालिकेची उद्याने,खुली मैदाने, चालणे, सायकलींग आठवड्याचे सर्व दिवस पहाटे ५ ते सकाळी ९ आणि दुपारी ४ ते सायंकाळी ७ सुरू खुले असणार
– खासगी कार्यालय कामाच्या दिवसी ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार
– आऊटडोअर खेळ आठवड्याची सर्व दिवस सुरू राहतील.
– इनडोअर खेळ सकाळी ५ ते ९ व दुपारी ५ ते ७ या वेळेत सुरू राहतील.
– सामाजिक, धार्मिक, राजकीय, मनोरंजन कार्यक्रमासाठी ५० लोकांची मर्यादा
– लग्नासाठी हॉलच्या ५० टक्के क्षमतेने जास्तीत जास्त ५० लोकांची उपस्थिती असणार
– अंत्यविधी, दशक्रियाविधी साठी २० लोकांची मर्यादा
– महापालिकेच्या सभा, बैठका, सहकारी संस्थांच्या मुख्यसभा ५० टक्के उपस्थितीत सुरू करता येणार
– इ कॉमर्स सुरू राहणार
– सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ५० टक्के क्षमतेने सुरू
– उद्योग नियमितपणे सुरू राहतील.
मद्यविक्री आठवडाभर सुरू
सध्या मद्यविक्री सोमवार ते शुक्रवार या काळात सुरू होती. मात्र आता शनिवारी व रविवारी देखील मद्यविक्रीची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
चित्रपटगृह, नाट्यगृहे बंद
शहरातील मॉल सुरू होणार असले तरी चित्रपटगृहे व नाट्यगृहे अद्यापही सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली नाही.