पुणे-खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे १००% भरल्यामुळे सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा ९४१६ क्युसेक्स विसर्ग वाढवून ठीक संध्याकाळी ०४:०० वा. १८,४९१ क्यूसेक्स करण्यात आला आहे.तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे अशी माहिती खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्पाचे सहायक अभियंता यो.स.भंडलकर यांनी येथे दिली . त्याचबरोबर पानशेत धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रामध्ये सुरू असणारा १८,७८४ क्यूसेक्स विसर्ग कमी करून ठीक संध्याकाळी ०४:०० वा. १२,९३६ क्यूसेक्स करण्यात आला आहे.
नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी.सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी.असे आवाहनही त्यांनी केले आहे .
आज दु. १२ दरम्यान खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये साधारण ३४२४ क्युसेक ने विसर्ग सुरू करण्यात आला .
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा ३४२४ क्युसेक्स विसर्ग वाढवून ठीक दु. ०२:०० वा. ९४१६ क्यूसेक्स करण्यात आला.
खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे १००% भरल्यामुळे सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा ९४१६ क्युसेक्स विसर्ग वाढवून ठीक संध्याकाळी ०४:०० वा. १८,४९१ क्यूसेक्स करण्यात आला.