पुणे मॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम 2019
पुणे: पुणे मॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम 2019 या स्पर्धेत द इंडियन सेंट लेजर या शर्यतीत ऍडज्युडिकेट या घोड्याने 2800 मीटर या स्पर्धेतील आतापर्यंतच्या सर्वात लांब अंतरावरच्या या मुख्य शर्यतीमध्ये चमकदार कामगिरी करत विजय मिळवला.
रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब (आरडब्लूआयटीसी) येथे सुरु असलेल्या या स्पर्धेतील द इंडियन सेंट लेजर या महत्वाच्या लढतीत सुम स्टड फार्म प्रायव्हेट लिमिटेडचे प्रतिनिधी मिसेस डी खैतान, मिस्टर अँड मिसेस ए खैतान आणि मिसेस डी जालन, एरियन हॉर्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचे प्रतिनिधी डी.ए.नंदा, ईशा नंदा भोजवानी व अमिताभ नंदा यांच्या मालकीच्या ऍडज्युडिकेट या घोड्याने 3 मिनिट 07 सेकंद व 944 मिनीसेकंद वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला. याचा ए संदेश हा जॉकी होता, तर जेम्स मिकोन ट्रेनर होता.
सविस्तर निकाल: द इंडियन सेंट लेजर
विजेता: ऍडज्युडिकेट, उपविजेता: रॉबर्टा.