पुणे-बँक ऑफ महाराष्ट्रच्या पुणे पूर्व अंचल कार्यालयातर्फे दिनांक 16 मार्च, 2019 रोजी लोणी काळभोर येथे स्वयं सहाय्यता समूह आणि शेतकर्यांसाठी शेतकरी संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले होते ज्यात आसपासच्या परिसरातील बँकेचे सुमारे 1200 ते 1400 ग्राहक सामील झाले होते. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शेतकर्यांना मार्गदर्शन करून त्यांना बँकेच्या विविध कृषी कर्ज योजनांची माहिती देणे आणि त्यांच्यात जागरूकता आणणे हे होते. हा कार्यक्रम लोणी काळभोर येथील जिजाऊ गार्डन येथे करण्यात आला होता.
यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक श्री हेमन्त टम्टा यांच्या हस्ते 168 लाभार्थीना रुपये 10कोटी रकमेची कर्ज मंजूरी पत्रे वितरित केली गेली. शेतकर्यांशिवाय बँक लघु उद्योग आणि स्वयं सहाय्यता समुहानादेखील कर्ज मंजूर करते जे राज्याच्या आर्थिक विकासामध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावातात.
यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक श्री हेमन्त टम्टा म्हणाले की, “महाराष्ट्र राज्याचीअर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कृषी क्षेत्र तसेच सेवा आणि उद्योग क्षेत्रावर अवलंबित आहे. राज्याच्या एकूणजीडीपीमधील जवळपास 11% सहभाग कृषी क्षेत्रातुन येतो आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या विकासामध्येअभिन्न भूमिकेचा दृष्टिकोन राखणारी ही बँक असल्या कारणाने आम्ही शेतकरी आणि स्वयं सहाय्यता समूहयांना आपल्या सेवा अधिक संवेदनशीलतेने देण्याचा करण्याचा निर्णय घेतला आहे.”
श्री टम्टा पुढे म्हणाले की, या शेतकरी संपर्क अभियानाच्या माध्यमातून विविध कर्ज योजनांवर शेतकरी आणि स्वयं सहाय्यता समूह यांना शिक्षित करण्याचे आमचे ध्येय आहे. आम्ही उत्तम कृषी तसेचव्यवसाय पद्धतींवर त्यांना अधिक शिक्षित करणे आणि आर्थिक तज्ञांबरोबर चर्चा करण्यासाठी त्यांना व्यासपीठ देण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. आम्ही महाराष्ट्र राज्यातील शेतकर्यांच्या प्रगती आणि समृद्धीच्या कार्यात उत्प्रेरकाची भूमिका निभावण्यासाठी तत्पर आहोत.”
या कार्यक्रमामध्ये यशस्वी ग्राहकांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव करून सम्मानित करण्यात आले.