पुणे- पुणे आर टी ओ ने आमच्या विषयी केलेली कार्यवाही हि अतिरेकी आणि अस्वीकार्य व न्यायालयाने जारी केलेल्या संरक्षणात्मक आदेशात हस्तक्षेप करणारी आहे असा दावा रॅपिडो च्या वतीने माध्यमांकडे करण्यात आला आहे .
रॅपिडोच्या प्रवक्त्याने सांगितले कि,’पुणे आरटीओकडून आम्हाला ऑर्डर मिळाली आहे आणि या अस्वीकार्य आदेशाला विरोध करण्यासाठी कायदेशीर पर्यायांसह सर्व पर्यायांवर आम्ही विचार करत आहोत. रोज प्रवास करणाऱ्या लाखो पुणेकरांना वाहतुकीची सुविधाजनक, सक्षम आणि किफायतशीर पद्धत उपलब्ध करवून देण्याच्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ५७००० रॅपिड कॅप्टन्स व त्यांच्या कुटुंबियांना उपजीविका प्रदान करण्याच्या आमच्या उद्दिष्टाला अनुसरून आम्ही पुढील कृती करणार आहोत. आमच्या विरोधात जबरदस्तीने जर काही कारवाई केली गेली तर ती पुणे आरटीओची अतिरेकी कार्यवाही ठरेल तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या संरक्षणात्मक आदेशात तो एक हस्तक्षेप ठरेल.