पुणे -प्रत्येक १५ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत १८ ते ४४ वयोगटाकरीता स्वंतत्र लसीकरण केंद्र चालु करणे,लसीकरणाचा वेग वाढविणे आणि अन्य काही मागण्यांसाठी आज राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप , महापालिकेतील विपक्षनेत्या दिपाली धुमाळ,रुपाली चाकणकर तसेच अश्विनी नितीन कदम, विशाल तांबे ,बाबुराव चांदेरे,जयदेव गायकवाड आदींनी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेऊन त्यंना लेखी निवेदन साद केले.
यावेळी महापालिका आयुक्तांना असे सांगण्यात आले कि ,’शहरासहीत महाराष्ट्र संपुर्ण भारत देशाने कोरोना विरुध्द लढण्यासाठी प्राण पणाला लावले आहेत. या लढाईत गेले दिड वर्षापासुन पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे महापालिका प्रशासन तथा सत्त्ताधा-यांच्या खांद्याला खांदा लावून समस्त पुणेकरांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.तरी सुध्दा सत्ताधारी भाजपच्या निषकाळजी पणामुळे हजारो पुणेकरांना जीव गमवायला लागला आहे.तरी या गोष्टीचे राजकारण करण्यामध्ये आमच्या पक्षाची कुठल्या ही प्रकारची ईच्छा नाही. प्रशासनाला हाताळण्यामध्ये, तसेच लोकप्रतिनिधीशीं संवाद ठेवण्यामध्ये सत्ताधारी अपयशी ठरलेले आहे.कोरोनाच्या दुस-या लाटेशी लढत असताना तिस-या लाटेशी मुकाबला करणेसाठी आपण सज्ज असलो पाहिजे, याकरीता काही बाबी आपल्यासमोर ठेवत आहे.तरी त्यावर जलदगतीने कार्यवाही व्हावी अशी विनंती आहे .
१)महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे.२)प्रत्येक १५ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत १८ ते ४४ वयोगटाकरीता स्वंतत्र लसीकरण केंद्र चालु करणे अत्यंत गरजेचे आहे.३)रेमडिसिवरचा पुरवठा वाढवण्याची गरज आहे. ४)ॲ।क्सिजन पुरवठा सुध्दा वाढविणे गरजेचे आहे. ५)लसीकरणाची योग्य माहिती पुणेकरांना देण्यासाठी सक्षम यंत्रणा(कॅ।ल सेंटर) उभारण्याची आवश्यकता आहे.
सत्ताधा-यांच्या आढमुठ धोरणामुळे संवादाची काही अडचणी येत असतील तर महाराष्ट्र सरकार व पुणे महानगरपालिकेच्या या मध्ये संवादाचा दुवा साधण्यास महाविकास आघाडी सरकारमधला एक घटक महणुन पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तयार आहे.