पुणे- पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज काँग्रेस भवन येथ कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी ईच्छुक उमेदवारांच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणुकीचे निरीक्षक आ. संग्राम थोपटे यांनी मुलाखती घेतल्या. या मुलाखती मध्ये अनेक विद्यमान व माजी नगरसेवकांनी मुलाखती दिल्या. या मुलाखती दरम्यान प्रत्येक ईच्छुक उमेदवाराने आपापल्या पध्दतीने निवडणुक कशा पध्दतीने लढविली पाहिजे याबाबत आपले मत व्यक्त केले.
यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, नगरसेवक रविंद्र धंगेकर, बाळासाहेब दाभेकर, कमल व्यवहारे, नीता रजपूत, संगीता तिवारी, विजय तिकोणे, आरीफ कांचवाला, संजय कांबळे, भोलेनाथ वांजळे, योगेश भोकरे, ऋषीकेश वीरकर, गौरव बाळंदे, अस्लम बागवान, शिवाजीराव आढाव, गोपाळ तिवारी आदी ईच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या.