पुणे – काल महापालिकेच्या मुख्य सभेत कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी मेट्रोच्या गाडगीळ यांना खुली आव्हाने देणारे सवाल केले पण त्यावर गाडगीळ यांनी कोणतीही उत्तरे दिली नाहीत ..काय म्हणाले आबा बागुल ते ऐका त्यांच्याच शब्दात ..
३०० कोटी पर किलो मीटर ची मेट्रो ८०० कोटी रुपये पर किलोमीटर दरावर कशी ,कोणी पोहोचविली ? या किमतीची कोणत्या तज्ञांकडून खातरजमा करवून घेतली ? नागपूर ,मुंबई ला महापालिकांना ० टक्के खर्च आणि पुणे महापालिकेला मात्र ९५१ कोटी अधिक जागा असा १६४१ कोटी रुपये खर्च असे का? पुणे आणि पिंपरी महापालिकेने केवळ ५ टक्के खर्च द्यायचा ,जागा वगैरे काही नाही , १० रुपयात ,१५ रुपयात मेट्रोचा प्रवास होईल अशी स्वप्ने दाखविली – ती पूर्ण होणार काय – मेट्रोपर्यंत पोहोचवणारी पीएमपीएमएल, रिक्षा आर्थिकदृष्ट्या सबल होणार काय ? डिफेन्स ची परवानगी न घेता मेट्रो प्लान केल्याने खडकीत मेट्रो अडकली -पुढे काय कसे होणार ? अगोदर परवानगी का घेतली नाही ? कर्वे रोड वरून जाणारी मेट्रो नदीत कोणी का घुसविली ?कोणी हे मार्ग बदलले ? आपले महापालिकेचे अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधून का बसलेत ? -कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांचे असंख्य सवाल …मेट्रोच्या गाडगीळ यांना…