पुणे -आज शिवाजीनगर-घोलेरोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत वडारवाडी , हेल्थ कॅम्प, रामोशीवाडी,गोखलेनगर, जनवाडी जनता वसाहत,कुसाळकर पुतळा चौक येथे कोव्हिड-19 या सांसर्गिक रोगामुळे बाधित परिसरातील भागाची पहाणी पशुसंवर्धन संचालक श्री सचिंद्र प्रताप सिंग यांनी केली.
महापालिका उपायुक्त नितीन उदास, संदीप काळे (सभासद पुणे मनपा वृक्ष प्रा),आरोग्य अधिकारी डॉ संतोष मुळे,डॉक्टर मृणालिनी कोलते अधिकारी प्रमुख आरोग्य निरीक्षक आय एस इनामदार सर्व आरोग्य निरीक्षक व मोकादम उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ नागरिक तसेच मधुमेह,ब्लड प्रेश, हृदय विकार असलेल्या नागरिकांची मोठया प्रमाणात आरोग्याची तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले. संक्रमित झालेल्या भागातील स्वच्छतागृहाची पहाणी करून योग्य त्या उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात आले. कुसाळकर पुतळा चौकात आरोग्य तपासणी करिता फिरता दवाखान्यात नागरिकांची तपासणी करण्यात येत असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे त्या भागातील स्थानिक नगरसेवक आदित्य माळवे यांनी सांगितले .