डुबेरे (नाशिक) या जन्मस्थानी होणार स्मारक : थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान घेणार पुढाकार
पुणे : अपराजीत योद्धा बाजीराव पेशवे यांच्या कर्तृत्वाचे स्मरण करण्यासाठी थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने त्यांच्या नाशिकमधील डुबेरे येथील जन्मस्थानी त्यांच्या आजोळला पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यासोबतच पालखेड आणि पुण्यातील राष्टीय संरक्षण प्रबोधिनीत देखील पुतळा उभारला जाणार आहे. ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महारांजांचे पुतळे आहेत तेथे त्यांचे पंतप्रधान बाजीराव पेशवे यांचे देखील पुतळे उभारले जावेत, अशी मागणी प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे यांनी केली.
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या २८२ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या शनिवारवाड्यावरील अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. संदीप खर्डेकर, प्रतिष्ठानचे विश्वस्त श्रीकांत नगरकर,चिंतामणी क्षीरसागर, मोरेश्वर गांगल, रविंद्र कुलकर्णी यावेळी उपस्थित होते