कोरोनाशी लढणाऱ्या योद्ध्यांना रसद प्रोटीनयुक्त आहाराची (व्हिडीओ)
पुणे- कोरोनाने जगावर आक्रमण केले असताना संकटात सापडलेल्या आम जनतेला एकीकडे मदतीचा हाथ देताना , कोरोनाशी दोन हाथ करू पाहणाऱ्या डॉक्टरांना प्रोटीनयुक्त आहार पुरविण्याचा प्रयत्न शिवाजीराव माधवराव मानकर आणि दिवा प्रतिष्ठान ने सुरु केला आहे .
सुके चिकन ,रोस्टेड चिकन ,पनीर, मशरूम आदींचा समावेश असलेले पदार्थ आहार म्हणून सुरुवातीला ससून मध्ये कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टरांना देण्याचे काम दिवा प्रतिष्ठान ने सुरु केले आहे . कोथरूड येथून हे पदार्थ बनवून महापालिकेपर्यंत नेण्यात येतात आणि तिथून ससून च्या गाडीतून ते डॉक्टरांपर्यंत पोहोचविण्यात येतात .आताची हि लढाई वेगळी आणि नवखी आहे. ज्या डॉक्टरांना आपण देवाचा दर्जा देतो ते डॉक्टर आता सैनिक बनले आहेत . तेच या लाधैतील योद्धे आहेत जे मृत्यूला फेकून जीवनासाठी झगडत आहेत . या डॉक्टरांना रोज प्रोटीनयुक्त आहार देण्याची गरज आहे .आम्ही हा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करतो आहे . हा सेतू बनो आणि याच सेतू वरून कोरोनाला समुद्रात तळाशी गाडून टाकण्याची शक्ती डॉक्टरांना मिळू देत अशी प्रार्थना आहे अशी भावना मायमराठी शी बोलताना शिवाजीराव मानकर यांनी व्यक्त केली . तर त्यांचे कार्यकर्ते निलेश शिंदे यांनी याबाबत माहिती दिली …पहा हा अल्पसा व्हिडीओ रिपोर्ट ….
https://www.youtube.com/watch?v=WiuW2oYmLJE