पुणे- महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना महापौर दालनात मारहाण प्रकरणात आज रात्री उशिरा कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि रवी धंगेकरांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आय ए एस अधिकाऱ्याला चप्पल फेकून मारणे. अंगावर धावून जाणे ,शिवीगाळ करणे याप्रकरणी पोलिसांनी हि तक्रार नोंदवून घेतली आहे स्वतः अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी पोलिसात या प्रकरणी तक्रार नोंदविली आहे .शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक वाघमारे याप्रकरणी तपास करीत आहेत .आज सायंकाळी महापौर दालनात हा प्रकार झाला होता .