पुणे, दिनांक,3( प्रतिनिधी ): कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाला ऑक्सीजन प्रकल्प उभे करण्यासाठी खासदार गिरीश बापट यांनी सोमवारी पन्नास लाख रुपयांचे अर्थसहाय्य खासदार निधीतून उपलब्ध करून दिले. तसेच या दोन्ही ठिकाणच्या रुग्णालयास रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी बापट यांनी आणखी अठ्ठावीस लाख रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला. खासदार गिरीश बापट यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. बापट यांनी सोमवारी जिल्हाधिकारी व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य अधिकारी यांना पत्र लिहून निधी उपलब्ध करून द्यावा. अशी विनंती केली आहे. या निधीतून पुणे कन्टोनमेंट मधील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयास 39 लाख रुपये उपलब्ध होणार आहेत. तेवढीच रक्कम खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयाससही उपलब्ध होणार आहे. अशी माहिती या पत्रकात देण्यात आली आहे. खासदार बापट यांनी आज प्रशासकीय अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हा निधी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा अशी विनंती केली. असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.