विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीतर्फे आयोजन
(२४ ते ३० नोव्हेंबर पर्यंत विविध क्षेत्रातील वक्त्यांचे व्याख्याने)
पुणे, दि. २३ नोव्हेंबर : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत गुरूवार, दि. २४ नोव्हेंबर ते बुधवार, दि. ३० नोव्हेंबर या कालावधीत २७वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमाला एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संतश्री ज्ञानेश्वर सभागृह, कोथरूड, पुणे येथे ेआयोजित करण्यात आली आहे.
या व्याख्यानमालेचा उद्घाटन समारंभ गुरूवार, दि. २४ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी ४.०० वा. होणार आहे. या समारंभासाठी अमेरिकेतील प्रसिद्ध लेखक आणि जागतिक स्तरावरील व्यावसायिक सल्लागार प्रा. राम चरण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. तसेच, अनामेय वैदिक आश्रमचे आध्यत्मिक गुरू स्वामी आशितोष व रामकृष्ण मिशनचे स्वामी समरपणानंद सन्माननीय पाहुणे असतील. अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड असतील.
बुधवार दि. ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११.०० वा. व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे. या समारंभासाठी राजस्थान विधानसभेचे सभापती डॉ.सी.पी जोशी, द्वारका येथील इस्कॉन मंदिराचे अमोग लिला दास, पद्मश्री शांती दूत सद्गुुरू ब्रह्मेशानंदचार्य स्वामी आणि कवी, लेखक व प्रेरक वक्ता डॉ. इंद्रजीत भालेराव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
२५ ते २९ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत दुपारी ४.३० वाजता होणार्या व्याख्यानमालेत राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील (राष्ट्रीश शिक्षण धोरण), पुणे येथील गोखले इन्स्टीट्यूट ऑफ पॉलिटेक्निक व इकॉनॉमीचे कुलगुरू डॉ. अजित रानडे (आर्थिक वाढ आणि समानता), इस्त्रोेचे माजी शास्त्रज्ञ डॉ. भानू पंत (इस्त्रोः आज आणि उद्या), नवी दिल्ली येथील डॉ. वेदाभ्यास कुंडू (नॉनव्हाइलेंट कम्यूनिकेशन फॉर हार्मेनियस कोएक्झीटन्स), महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य सचिव श्रिकांत देशपांडे ( इन सर्च ऑफ व्हाब्रंट डेमॉक्रॉसी अॅण्ड पीस) अशा मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत.
या व्याख्यानमालेला जोडूनच सकाळी ८.४५ ते १२.०० पर्यंत कार्याशाळा होणार आहे. यामध्ये आध्यात्मिक वक्ता डॉ. भावार्थ देखणे, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीचे माजी प्र्रभारी कुलगुरू सय्यद अहमद अली, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, विचारवंत व प्रेरणादायी वक्ते डॉ. संजय उपाध्ये, डीआरडीच्या संशोधन आणि विकास आस्थापनाचे संचालक प्रदीप कुरूळकर, सामाजिक कार्यकर्ता रमेश पानसे, प्रसिद्ध हदय रोग तज्ञ डॉ. जगदिश हिरेमठ, रिंगणचे मुख्य संपादक सचिन परब, लेखक व इतिहास अभ्यासक प्रा.नितीन बालगुडे पाटील, युनेस्को चेअर डॉ. प्रियंकर उपाध्याय, पिस फेलो डॉ. अंजू उपाध्याय, लेखक विश्वासराव पाटील या मान्यवरांची विश्वशांती, संस्कृती व प्रबोधन इत्यादी विषयांवर व्याख्यानांची विशेष कार्यशाळाही आयोजित केली आहे.
प्रत्येक व्याख्यानानंतर वक्ता व श्रोते यांच्यामधील प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम हे या व्याख्यानमालांचे वैशिष्ट्य आहे. विशेष म्हणजे या व्याख्यानमालेमध्ये २५ ते २९ नोव्हेंबर पर्यंत माईर्स एमआयटी संकुलातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी सकाळी ७.०० ते ८.०० या वेळात योगासन वर्गाचेही आयोजन स्कूल ऑफ योग अँड मेडिटेशन चे विभाग प्रमुख प्रा. निरंजन खैरे व क्रीडा विभागाचे संचालक प्रा.डॉ. पी. जी. धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. योगासन वर्ग आयोजित करणारी माईर्स एमआयटी, पुणे ही एकमेव शैक्षणिक संस्था आहे.
‘विज्ञान व अध्यात्माच्या समन्वयातूनच जगामध्ये शांतता नांदेल’, हे स्वामी विवेकानंदांचे वचन व तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरु संतश्री तुकाराम महाराज यांच्या ज्ञानेश्वरी व गाथेतील ज्ञान-विज्ञानाधिष्ठित तत्त्वदर्शन हा या व्याख्यानमालेचा मुख्य हेतू आहे.
या व्याख्यानमालेसाठी शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, तसेच, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांना निमंत्रित केले असून, मानवी आणि आध्यात्मिक मूल्यांचे या व्याख्यानमालेद्वारे संवर्धन व्हावे, हा या व्याख्यानमालेमागील प्रमुख उद्देश आहे.
आयोजित व्याख्यानमाला सर्वांसाठी खुली ठेवण्यात आली आहे.
अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड व २७ व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. मिलिंद पांडे यांनी दिली.