पुणे- पुण्यात आणि पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या ४ धरणांच्या साखळी च्या पाणलोट क्षेत्रात रात्री जोरदार पाउस झाल्याने पानशेत धरण १०० टक्के भरले असून या धरणातून १८ हजार ७८४ क्युसेस वेगाने पाणी सोडले जाऊ लागले आहे हे पाणी खडकवासल्याकडे झेपावण्यास सकाळी सव्वादहा वाजता सुरुवात झाली .पानशेत धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे १००% भरले असल्याने पानशेत धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रामध्ये सुरू असणारा ७३७६ क्यूसेक्स विसर्ग वाढवून ठीक सकाळी ०९:३० वा. १२,९३६ क्यूसेक्स करण्यात आला होता अशी माहिती खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्पाचे सहाय्यक अभियंता, श्रेणी १ -यो.स.भंडलकर यांनी येथे दिली .पानशेत धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रामध्ये सुरू असणारा १२,९३६ क्यूसेक्स विसर्ग वाढवून ठीक सकाळी १०:१५ वा. १८,७८४ क्यूसेक्स करण्यात आला आहे.तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे असेही ते म्हणाले.
धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे आज दु. १२ दरम्यान खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये साधारण ३४२४ क्युसेक ने विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.असे सांगून ते म्हणाले,’कृपया नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी.सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी.
वाढता वाढे पानशेत चा विसर्ग
पानशेत धरणाच्या सांडव्यावरून सकाळी ०७:०० वा. ९७७ क्यूसेक्स विसर्ग-नदीपात्रामध्ये सुरू असणारा ९७७ क्यूसेक्स विसर्ग ठीक सकाळी ०८:०० वा. १९८० क्यूसेक्स करण्यात आला .पानशेत धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रामध्ये सुरू असणारा १९८० क्यूसेक्स विसर्ग वाढवून ठीक सकाळी ०८:३० वा. ३९०८ क्यूसेक्स करण्यात आला .पानशेत धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रामध्ये सुरू असणारा ३९०८ क्यूसेक्स विसर्ग वाढवून ठीक सकाळी ०९:०० वा. ७३७६ क्यूसेक्स करण्यात आला.सकाळी ०९:३० वा. १२,९३६ क्यूसेक्स करण्यात आला..सकाळी १०:१५ वा. १८,७८४ क्यूसेक्स करण्यात आला