पुणे – प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न हायस्कूल वारजे प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला असून प्रशालेत प्रथम क्रमांक गावडे रोहित पुंडलिक ९३.२०% द्वितीय मिरकले साक्षी रविकांत ९१.२०% तृतीय भिलारे हर्षल रामचंद्र ९०.६०% या विद्यार्थ्यांनी प्रशालेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त केले.शाळेचा शंभर टक्के निकाल लागला.मुख्याध्यापिका रोहिणी काळे, शाळा समिती अध्यक्ष आणि कार्यवाह शामकांत देशमुख, प्रमुख्याध्यापक योगेश ठिपसे यांनी उत्तीर्ण विद्यार्थी,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे,उपकार्यवाह व नगरसेविका,महिला बालकल्याण सभापती पुणे म.न.पा.ज्योत्स्ना एकबोटे यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थी, सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर,मुख्याध्यापक यांचे कौतुक केले.