पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभाग व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाच्या वतीने शहरातील
विविध परिसरातील अतिक्रमणांवर व अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.
पुणे शहरातील बाणेर रोड, सूस रोड, कर्वेरोड, रुबी हॉल वाडिया कॉलेज, गोqवद हलवाई चौक, qसहगड राड,
सोलापू रोड, संतोषनगर कात्रज, शिवरकर रोड, लुल्लानगर कोंढवा इ. परिसरामध्ये सार्वज़निक पदपथावरील
अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच राजभवन रोड, आयटीआय रोड, सूस रोडवरील फळविक्री
करणाèया व्यावसायिक ३ टेम्पो जप्त करण्यात आले आहेत. तसेच १३ स्टॉल, ४१ हातगाडी, ५७ पथारी, २० शेड, ९
इतर, ३ व्यावसायिक टेम्पो असे एकूण १४३ अतिक्रमणांवर जप्तीची कारवाई करण्यात आली.
टिळकरस्ता व कोथरुड क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत शहराच्या परिसरातील qसहगड रोड धायरी फाटा ते धायरी
गाव या रस्त्यावरील इमारतींच्या सामासिक अंतरामधील पक्क्या स्वरुपाचे १०००० चौ. फुट अनधिकृत बांधकामांवर
कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच कोथरुड क्षेत्रिय कार्यालय हद्दीमध्ये केळेवाडी येथील ४५० चौ. फुट अनधिकृत
बांधकामावर कारवाई करण्यात आलेली आहे.