पुणे लष्कर भागातील सोलापूर रोड येथील बंगला नंबर एकमधील हजरत सय्यद मोहम्मद साहब रहे पाचपीरचा ४३५ चा उरूस उत्साहात साजरा करण्यात आला . या उरुसानिमित विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले . यामध्ये कुराणख्वानी , संदल , महफिल ए समा आदी धार्मिक कार्यक्रम झाले . त्यानंतर मनोहर अजमेरी पुनावाले यांचा कव्वालीचा कार्यक्रम झाला . यावेळी आम लंगरमध्ये भाविकांनी सहभागी होऊन प्रसादाचा लाभ घेतला . त्यानंतर जियारत उरुसाची सांगता झाली .
या उरुसाचे आयोजन हजरत सय्यद मोहम्मद साहब रहे पाचपीर खादीम जयकुमार राघवाचारी यांनी केले . या उरुसामध्ये हाजी अड. शाबीर खान , नगरसेवक प्रशांत जगताप , बंडूअण्णा आंदेकर , कृष्णराज आंदेकर , पोपट गायकवाड , हाफिज शेख , मुन्नावर कुरेशी , अल्ताफ शेख , शब्बीर शेख , आंतरराष्ट्रीय कलाकार कैलाशकुमार , तुषार त्रिवेदी , योगेश चव्हाण , इस्माईल शेख , शौकत शेख आदी मान्यवर उपस्थित होते .
या उरुसाच्या आयोजनासाठी सोमेश खरात , जनार्दन रसाळ , सुभाष अवघडे , मारुती पवळे , महेश मोरे , रवींद्र वाल्मिकी , संजय थोरात , नाझीम खैराज , उत्तम सावंत , अविनाश खरात , गुरुप्रसाद कोच्चर , मुनीर कुरेशी , अशोक चव्हाण आदींनी विशेष परिश्रम घेतले .