पुण्यातील अभिनव उपक्रम
पुणे- संकष्टी चतुर्थी आणि रमजानचा पवित्र उपवासनिमित्ताने पुणे मिडिया वॉच व सिद्धार्थ वाचनालय व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने ” सर्व धर्मीय रोजा इफ्तार कार्यक्रमात सर्व धर्मियांच्या धर्मगुरुनी एकमेकांना मोदक खजूर देऊन उपवास सोडविला . “ आपण सर्व एकच आहोत “ या राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश या कार्यक्रमातून दिला .
पुणे कॅम्पमधील छत्रपती शिवाजी मार्केट मागील सिद्धार्थ वाचनालय व ग्रंथालयाच्या आवारात कार्यक्रम झाला . या कार्यक्रमात हिंदू समाजातून देवीप्रसाद जोशी , मुस्लिम समाजातून मौलाना काझमी , ख्रिस्त समाजातून फादर माल्कम सिक्वेरा , शीख समाजातून भोलासिंग अरोरा , बौध्द समाजातून बाप्पूसाहेब भोसले , जैन समाजातून विनोद सोलंकी , लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीषक बरकत मुजावर , सिद्धार्थ वाचनालय व ग्रंथालयचे कार्याध्यक्ष बापूसाहेब गानला , पुणे मिडिया वॉचचे संचालक महेश जांभुळकर ,ग्रंथपाल दिलीप भिकुले , विकास भांबुरे , कवी बादशहा सय्यद , हाजी रशीद खिजर , इकबाल शेख , मनजितसिंग विरदी , रे फर्नाडिस , सुनील माने , मनोज पिल्ले , बबलू नाईकनवरे , विनय भगत , अच्युत निखळ , रणजित परदेशी , नितीन डिसोझा , राकेश छाजेड , गौसिया खान , भारती अंकलेल्लू , छाया जाधव , सरदार खान , दत्ता बोबडे , निलेश कणसे , अयुब खान , अक्रम शेख , युसुफ बागवान , वाहिद बियाबानी , प्रविण जाधव , चेतन मोरे , सुरेंद्र परदेशी , राजेंद्र घोलप , महेंद्र गायकवाड , सुहास पवार , मनोज निकाळजे आदी मान्यवर होते .
यावेळी संकष्टी चतुर्थीचे महत्व देवीप्रसाद जोशी यांनी पटवून दिले , तर रमजानचा पवित्र उपवासचे महत्व मौलानाकाझमी यांनी सांगितले . यावेळी वाहिद बियाबानी यांनी दुवाचे वाचन केले .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत पुणे मिडिया वॉचचे संचालक महेश जांभुळकर यांनी केले तर सूत्रसंचालन विकास भांबुरे यांनी केले तर आभार दिलीप भिकुले यांनी मानले .