पुणे-शिवसेना पिंपरी-चिंचवड शहरसंघटकपदी ज्येष्ठ पत्रकार व शिवसैनिक नंदकुमार सातुर्डेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सातुर्डेकर हे गेली 30 वर्षांपासून पत्रकारीतेत कार्यरत असून विविध वृत्तपत्रात त्यांनी महत्त्वाच्या जबाबदा-या सांभाळल्या आहेत. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवरही त्यांनी सदस्य म्हणून दोनदा उल्लेखनीय काम केले आहे. विधानसभा, लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची प्रचारयंत्रणाही त्यांनी सांभाळली होती. भारतीय विद्यार्थी सेनेचे शहर उपप्रमुख, शिवसेना विभाग उपप्रमुखपद या पदांवरही त्यांनी यापुर्वी काम केले आहे. हा अनुभव विचारात घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नंदकुमार सातुर्डेकर यांच्याकडे शहरसंघटकपदाची धुरा सोपविली आहे.प्रसिद्धीमाध्यम आणि सोशल मिडियाची वाढती ताकद विचारात घेऊनहि निवड करण्यात आल्याचे सांगण्यात येते