पुणे : पुण्यातील मिलीटरी इंजिनिअरिंगमध्ये झालेल्या अपघातात दोन जवानांचा मृत्यू तर ०९ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. जवान बॅली सस्पेन्शन ब्रिज लाँच करण्याचे प्रशिक्षण केले जात असताना एका बाजुच्या ब्रिजचा टॉवर पडला. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (CME) भारतीय लष्कराचे इंजिनिअर्सचे एक प्रमुख तांत्रिक आणि सामरिक प्रशिक्षण संस्था आहे. यात कॉम्बॅट इंजिनिअर, मिलिटरी इंजिनिअरिंग सर्विस, बॉर्डर रेड्स इंजिनिअरिंग सर्विस (BRES) आणि सर्वे या सर्वांचा समावेश आहे.यात एकूण ०९ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी डीसी शर्मा आणि सोनू कुमार या दोन शिपायांची प्रकृती चिंताजनक आहे. खडकी हॉस्पिटलमध्ये दोघांवर तर कमांड हॉस्पिटलमध्ये तिघांवर सध्या उपचार सुरू आहेत
जखमींची नावे :
- मेजर सुर्यजित सिंग (खडकी)
- सुभेदार पी शंमुग्म (खडकी)
- नायक गोरे बीपी (कमांड)
- नायक शरद खोले (कमांड)
- नायक डीसी शर्मा (खडकी)
- नायक देवेंद्र सिंग बिष्ट (कमांड)
- हवालदार परमजीत सिंग (खडकी)
- नायक गुरपीत सिंग (खडकी)
- नायक मंदीप सिंग (सीएमई)