अन्याय सहन करण्याचा पारंपारिक वृत्तीमुळे महिलांसह समाजाच्या वाट्याला अन्याय च येतो ,त्यामुळे अन्यायाला विरोध करून ,झगडून न्याय मिळविण्याची सवय लावून घेतली पाहिजे ‘. शासकीय प्रश्नाबाबत माहिती अधिकार वापरण्यावर त्यांनी भर दिला
महिलांनी अन्याय सहन करण्याची वृत्ती सोडावी :विनिता देशमुख
बुरसटलेली मानसिकता दूर करून अन्यायावर प्रहार करा :राही भिडे
लायन्स क्लब ऑफ पुणे एलीट ‘ च्या ‘स्वयंसिद्धा ‘ पुरस्कारांचे वितरण
पुणे :
‘ अन्याय सहन करण्याचा पारंपारिक वृत्तीमुळे महिलांसह समाजाच्या वाट्याला अन्याय च येतो ,त्यामुळे अन्यायाला विरोध करून ,झगडून न्याय मिळविण्याची सवय लावून घेतली पाहिजे ‘ ,असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या विनिता देशमुख यांनी केले
‘ लायन्स क्लब ऑफ पुणे एलीट ‘ च्या ‘स्वयंसिद्धा ‘ पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुण्या या नात्याने त्या बोलत होत्या .
जलतरण पटू गौरी गाडगीळ यांच्या मातुश्री स्नेहा गाडगीळ , ‘ प्रबोधन माध्यम ‘ (न्यूज एजेन्सी ) च्या संचालक गौरी बिडकर , प्रकाशक डॉ स्नेहसुधा कुलकर्णी ,डॉ गिरीजा शिंदे,प्राजक्ता कोळपकर ,सारा सिधये ,प्राची लिमये -शहा यांच्यासह एकूण १५ महिलांचा गौरव विनिता देशमुख आणि पुण्यनगरी च्या संपादक राही भिडे ,प्रांतपाल विक्रांत जाधव यांच्या हस्ते करण्यात आला
.
परिस्थितीशी संघर्ष करत यशस्वी कामगिरी करणाऱ्या महिलांना सावित्रीबाई फुले स्मृतिदिन आणि महिलादिनानिमित्त हे पुरस्कार दिले जातात . पुरस्काराचे हे दशकपूर्ती वर्ष आहे .
विनिता देशमुख म्हणाल्या ,’ नागरी प्रश्न ,ग्राहकांचे प्रश्न ,महिलांचे प्रश्न ,प्रशासनातील प्रश्न अशा सर्व बाबतीत भारतीय सहनशीलतेमुळे अन्याय होत राहिले .
राही भिडे म्हणाल्या ,’ स्त्रियांना अधिकार पदावर येण्यावाचून पुरुषी मानसिकता रोखत आली आहे . पत्रकारिता आणि बौद्धिक क्षेत्रातही याचा अनुभव येतो ,हि खेदा ची बाब आहे . नर -मादी दृष्टीकोन आणि बुरसटलेल्या मानसिकता दूर केल्याशिवाय स्त्रियांवरील अन्याय -अत्याचार दूर होणार नाहीत . दुष्ट प्रवृत्तींना उघड करून अन्यायावर प्रहार करण्यावर भर दिला पाहिजे ‘
लायन्स क्लब ऑफ पुणे एलीट च्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री पेंडसे ,क्लब अध्यक्ष छाया पांचाळ , डॉ ललित रावळ ,रवि चौधरी यावेळी उपस्थित होते
संध्या देवरुखकर यांनी सूत्र संचालन केले .
हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक १५ मार्च २०१५ रोजी स्वानंद सभागृह ,सहकारनगर येथे सकाळी साडे दहा वाजता पार पडला
पुरस्कारार्थी नावे :
१. .जलतरण पटू गौरी गाडगीळ यांच्या मातुश्री स्नेहा गाडगीळ ,
२. ‘ प्रबोधन माध्यम ‘ (न्यूज एजेन्सी ) च्या संचालक गौरी बिडकर ,
३. प्रकाशक डॉ स्नेहसुधा कुलकर्णी ,
४. डॉ रजनी गुप्ते ,
५. डॉ गिरीजा शिंदे
६. छाया जाधव
७. प्राजक्ता कोळपकर
८. चैताली माजगावकर
९. रिता सेठिया
१०. प्राची लिमये – शहा
११. योगिता भगत
१२. संध्या आगरकर
१३. पद्मावती शिवगुंडे
१४. सुशीला परदेशी
१५. सारा सिधये