पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड विभागातर्फे २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिनानिमित मराठी भाषेकरिता योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या सन्मान सोहळा व ग्रंथालयांना पुस्तक भेट उपक्रम उत्साहात पार पडला .
सिद्धार्थ ग्रंथालय येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात मनसेचे पुणे शहराध्यक्ष बाळा शेडगे , संघटक अशोक मेहंदळे , ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष बापूसाहेब गानला , शहर उपाध्यक्ष अजय शिंदे , यांच्याहस्ते मान्यवरांच्या सन्मान चिन्ह शाल व पुष्पगुछ देऊन सन्मान करण्यात आला . यावेळी पुणे कॅंटोन्मेंट विभागअध्यक्ष प्रशांत मते , आयोजक विकास भांबुरे , विनायक झिंगाडे , चिटणीस लक्ष्मीकांत बुलबुले , अतुल बेहेरे , ग्रंथपाल दिलीप भिकुले , पत्रकार महेश जांभुळकर , धर्मपाल कांबळे , संजय भोसले आदी मान्यवर उपस्थित होते .
मनसेतर्फे आयोजित केलेल्या या सन्मान सोहळ्यास हनुमंत गवळी (लेखक ), दिलीप आष्टेकर ( नाट्य दिग्दर्शक अभिनेते ) , वाल्मिक बारावकर ( मराठी भाषा शिक्षक ), अरु धुमाळ (एकपात्री नाट्य कलाकार ),नागराज नायडू ( पत्रकार ) , गोविंद भोंडे ( ग्रंथपाल ), महेंद्र सत्तूर ( आदर्श वाचक ), सौ. प्रज्ञा भांबुरे (गायिका ), आनंद जावडेकर ( दिग्दर्शक), भारती अंकलेल्लू ( अक्षरजुळणीकार ), संजय गायकवाड ( संगीतवादक ), व महेंद्र कांबळे (छायाचित्रकार ) यांचा सन्मान करण्यात करण्यात आला , तसेच सिद्धार्थ ग्रंथालय व श्री गीता ग्रंथालयास डॉ. अशोक कामत लिखित संत नामदेव महाराज ( ३ खंड ), भारताचे संविधान मराठी व इंग्रजी आवृत्ती , भारतीय राज्य घटना संक्षिप्त , हितगुज , विकासाचा वेध , मन सावर रे , कार्यशैली , वेळ बहुमोल आदी पुस्तके भेट देण्यात आली .
” मराठी हि आमची मातृभाषा असून तिचा सन्मान राखण हि प्रत्येकाची जबाबदारी आहे , महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार सदैव मराठी भाषा , मराठी माणूस व भूमिपुत्र यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी कटीबद्ध आहे ” असे मत मनसेचे पुणे शहराध्यक्ष बाळा शेडगे यांनी व्यक्त केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास भांबुरे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बबलू सय्यद , आनंद चौधरी , शुभम परदेशी , प्रमोद चव्हाण , लखन खैरे आदींनी परिश्रम घेतले . पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली .