पुणे- पुण्यातील प्रसिद्ध अशा अखिल मंडई गणपती मंडळाच्या शारदा गणपती मंदिरात आज पहाटे पाचच्या सुमारास अज्ञात एका चोरट्याने प्रवेश करीत मंदिरातील गणपतीचे दागिने चोरून नेल्याचा धक्कादायी प्रकार सकाळी उघडकीस आला . काहींच्या मते हि चोरी ३६ लाखाची तर काहींच्या मते ५० ते ५५ लाखांची असे सांगितले जात आहे . दरम्यान पहाटे पाच वाजून तीन मिनिटे झाली असताना एक इसम मंदिरात प्रवेश करताना सीसीटीव्हीत आढळून आला आहे. त्यानेच हि चोरी केली आहे असे निष्पन्न होते आहे . सी सी टीव्ही फुटेज वरून आता पोलीस त्याचा तपास करीत आहेत चोरट्याने मंदिरातील गणपतीच्या मूर्तीवरील सुमारे 50 तोळ्यांपेक्षा अधिक वजनाचे दागिने, हि-याचा महागडा नेकलेस चोरून नेला आहे
हल्ली पुणे असुरक्षित बनत चालले कि काय अशी दाट शंका यावी असे प्रकार पुण्यात घडत आहेत .सिंहगड रस्त्यावरील वाहनांच्या जाळपोळीच्या घटनेनंतर काळ सांयकाळी पर्वती परिसरात 2 गटात झालेली हाणामारी आज पहाटे झालेली हि चोरी या घटना पुणे असुरक्षित बनल्याची चाहूल देणाऱ्या ठरत आहेत . कोणताही मोठ्ठा गुन्हा घडो अथवा ना घडो पुण्यात पोलिसांची कडक नाकेबंदी असते तिचा मात्र आम माणसाला , दुचाकीस्वरांनाच सामना करावा लागतो. चोर- गुन्हेगार आपापली कृत्ये करून जातात आणि सामान्य माणसाला चौकाचौकात नाकेबंदीचा नाहक सामना करावा लागतो असे आजवर चित्र राहिले आहे खरे तर पुण्यातला मंडई हा भाग संवेदनशील भाग म्हणून रात्रभर येथे पोलिसांची गस्त असते या परिसरातील अनेक नानाविध धंद्यामुळे येथे पोलीस सतर्क असताना पहाटे चोरट्याने चोरी केल्याने खळबळ उडाली आहे . पुणे पोलिसांपुढे आता हि चोरी एक मोठ्ठे आव्हान बनले आहे .