पुणे महानगरपालिकेच्या औंध, वारजे कर्वेनगर, बिबवेवाडी, हडपसर, घोलेरस्ता, कोंढवा वानवडी, कसबा विश्रामबागवाडा, कोथरुड, कै. बा.स. ढोलेपाटील, धनकवडी या क्षेत्रिय कार्यालयांच्या परिसरा अंतर्गत ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक कॅरीबॅग विक्री, साठवणूक व वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक विक्रेत्यांविरुध्द कारवाई करण्यात आली.
सदरची कारवाई प्लॅस्टिक विरोधी मोहिम पथक व क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत विभागीय आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक यांच्या सहाय्याने कारवाई पूर्ण करणेत आली.
कारवाई अंतर्गत ५३ व्यावसायिक, विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात येऊन ११८ किलो प्लॅस्टिक कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या व प्रशासकीय शुल्कापोटी र.रु. १,३६,५००/- (र.रु.एक लाख छत्तीस हजार पाचशे पन्नास फक्त) वसूल करण्यात आले.
विभागीय आरोग्य निरीक्षक दिपक ढैलवान, प्लॅस्टिक विरोधी मोहिम पथक प्रमुख ईसाक शेख, सुर्यभान शिक्रे, आनंद नाईक, राजेश दरेकर, ललीता तमनर, आनंद चंदाले, श्री. खिरीड, अजित कुंटे, मंद्रुपकर, सिमा पुजारी, नवले, भरत लाखे, प्रियंका कंक, विक्रम काथवटे, राजेश थोरात, कारकुड, इनामदार यांनी कारवाई पूर्ण केली.