गणेशोत्सवात पोलिसांच्या सेवेसाठी मिनी हॉस्पिटल निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे पोलीस व गणेशभक्तांसाठी मोफत वैद्यकीय सेवा
पुणे : लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनापासून ते विसर्जन मिरवणुकीपर्यंत शहरात दर्शनासाठी आलेल्या गणेशभक्तांच्या संरक्षणाची जबाबदारी घेण्यास पोलीस अहोरात्र तैनात असतात. परंतु बंदोबस्तावर असताना पोलिसांचे स्वत:च्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होते. तसेच काही वेळा अचानक आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे या काळात पोलीस अधिकाºयांच्या व कर्मचाºयांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी निरंजन सेवाभावी संस्थेने पुढाकार घेतला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा गणेशोत्सवात पोलिस आधिकारी, कर्मचारी व गणेशभक्तांसाठी मिनी हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत वैद्यकीय सेवा दिली जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष जयेश कासट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी निलेश सोनिगरा, जगदीश मुंदडा, डॉ.अनंत बागुल, विराज तावरे, डॉ.नवनीत मानधनी आदी उपस्थित होते. विश्रामबाग फरासखाना पोलीस स्टेशनच्या आवारातील मिनी हॉस्पिटलचे उद्घाटन रविवार, दिनांक ४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. यावेळी युनिव्हर्सल हॉस्पिटलचे डॉ.अनंत बागुल, पारख फार्मास्युटिकल्सचे संदिप पारख, उद्योजक राजेश कासट उपस्थित राहणार आहेत. उपक्रमाचे यंदा ५ वे वर्ष आहे.
जयेश कासट म्हणाले, पुण्याच्या गणेशोत्सवाची परंपरा जगभर पोहोचली आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील हा उत्सव सुव्यवस्थित आणि आरोग्यदायी व्हावा यासाठी मिनी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी अनेक ठिकाणाहून लोक येतात. तसेच गणेशभक्तांच्या संरक्षणासाठी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना देखील अतिशय जागरुक राहून त्यांचे कर्तव्य पार पाडावे लागते. अशावेळी अचानक उद्भवणाºया आरोग्याच्या समस्यांसाठी मिनी हॉस्पिटल सज्ज असणार आहे.
डॉ.अनंत बागुल म्हणाले, मिनी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे, इंजेक्शन, सलाईन, ५ बेड यांसह अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. महिलांकरीता स्वतंत्र विभाग करण्यात आला आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीकरीता सर्व यंत्रणेसह १० डॉक्टरांची टीम सज्ज आहे. हा उपक्रम गणेशोत्सवात दहा दिवस रविवार, दिनांक ४ सप्टेंबर ते गणेश विसर्जनापर्यंत सुरु राहणार आहे. युनिव्हर्सल हॉस्पिटल आणि एमक्युअर फार्मास्युटिकल्सचे उपक्रमाला विशेष सहकार्य लाभले आहे.