पुणे–पुणे स्टेशन येथील आरोग्य संचालनालय कार्यालयाचे स्थलांतराला विरोध करण्यासाठी पब्लिक हेल्थ डिपार्टमेन्ट सबओर्डीनेट सर्विसेस असॊसिएशनच्यावतीने निदर्शने आंदोलन करण्यात आली . हे आंदोलन गुरुवार , १६ जुलै २०१५ रोजी सकाळी ११. ३० वाजता , मध्यवर्ती इमारत (सेन्ट्रल बिल्डिंग ) प्रवेशद्वार , हॉटेल सेन्ट्रल जवळ करण्यात आले . . शासन परिपत्रकाच्या विरोधात सर्व कर्मचारी घोषणा देऊन निदर्शने करणार आली
या निदर्शने आंदोलन पब्लिक हेल्थ डिपार्टमेन्ट सबओर्डीनेट सर्विसेस असॊसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार गुड्मेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले . निदर्शने आंदोलन नंतर साधु वासवानी चौक , कौसील हॉल , बंडगार्डन रोडमार्गे कर्मचारी बांधवानी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा नेला . यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना निवेदन देण्यात आले .