आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या अलिशा पीरझादे ला ‘पॉवर लिफ्टिंग’मध्ये सुवर्णपदक
पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या अलिशा पीरझादे या विद्यार्थीनीने ‘पॉवर लिफ्टिंग’ या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकाविले. ही राष्ट्रीय स्पर्धा जबलपूर येथे दिनांक 28 डिसेंबर 2015 ते 4 जानेवारी 2016 दरम्यान झाली होती. अलिशा पीरझादे ही विद्यार्थिनी आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षामध्ये शिकत आहे.
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार, आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ई. एम. खान, संगिता वाक्चौरे (संचालक, शारिरीक शिक्षण), शिक्षकवर्ग, विद्यार्थी यांनी अलिशाचे कौतुक केले