पुणे- शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकनेते, महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त आज काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास माजी आमदार व ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हास पवार व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
‘‘संघटनेतील कार्यकर्त्यांनी स्नेहाचे जाळे विनावे, माणसे सांभाळावी आणि माणसे वाढवावीत’’ पुण्यातील काँग्रेस भवन येथे स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या पुतळ्याखाली लिहिलेले हे शब्द कायमच काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला प्रेरणा देणारे आणि त्यांची ऊर्जा वाढविणारे राहणार आहेत. असे विचार आज पुण्यातील काँग्रेस भवन मध्ये यशवंतरावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष रमेश बागवे यांनी मांडले.
‘‘महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून स्व. यशवंतराव चव्हाण यांनी जेवढं महाराष्ट्रासाठी विविध योजनांच्या माध्यमातून केले तेवढंच भरभरून प्रेम त्यांना जनतेने दिले. इथून पुढेही त्यांचा आदर्श घेऊन महाराष्ट्रासाठी कायम उभे राहण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यकर्ता करत राहील’’ असे गौरवोद्गार माजी आमदार उल्हासदादा पवार यांनी काढले.
कार्यक्रमाचे आभार माजी महापौर कमल व्यवहारे यांनी मांडले. या कार्यक्रमात माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, ॲड. अभय छाजेड, वीरेंद्र किराड, हाजी नदाफ, बाळासाहेब अमराळे, सुनिल शिंदे, सतिश पवार, शिलार रतनगिरी, रमेश सोनकांबळे, सुनिल घाडगे, राजू नाणेकर, अनुसया गायकवाड, नारायण पाटोळे, निलेश सांगळे, भगवान धुमाळ, दिलीप लोळगे, देविदास लोणकर, आशिष व्यवहारे, विठ्ठल गायकवाड, परवेज तांबोळी, सुरेश कांबळे तसेच पुण्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

