पुणे – पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १० तारखेला अर्थसंकल्पीय भाषणात विधानसभेत बोलल्याप्रमाणे पुण्यातील आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे राष्ट्रीय स्मारका संदर्भात आढावा बैठक घेण्याचे घोषीत केले होते. याप्रमाणे नुकतीच त्यांनी स्मारकाच्या विषयावर तातडीची बैठक पुण्यात घेतली यावेळी पुणे महापालिका आयुक्त ,जिल्हाधिकारी ,समाजकल्याण आयुक्त ,भूमी संपादन अधिकारी यांना लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमवाडीतील स्मारक तातडीने सुरू करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनास देण्यात आले. अजितदादांनी स्मारका संदर्भात पुण्यामध्ये आढावा बैठक घेतली व स्मारकाच्या निर्माणासाठी सकारात्मक निर्णय घेतले त्याबद्दल अजित पवार यांचे महाराष्ट्रातील तमाम मातंग समाजाच्या वतीने बैठक झाल्यानंतर आभार मानण्यात आले .

या बैठकीला पुणे महानगरपालिकेचे आयुक्त,पुणे जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार व भूसंपादन प्रक्रियेतील अधिकारी उपस्थित होते बैठकीत पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते,नगरसेवक सुभाष जगताप ,नगरसेवक अविनाश बागवे ,दलित स्वयंसेवक संघाचे जिल्हा प्रमुख राजाभाऊ धडे, लहुजी शक्ती सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन जोगदंड, भास्कर नेटके, शिवसेनेचे बाळासाहेब भांडे,अखिल भारतीय बहुजन सेनेचे संस्थापक निलेश बबनराव वाघमारे उपस्थित होते.
यावेळी अजित पवार यांनी भूमी संपादनासाठी लागणारा 100 टक्के निधीचा प्रस्ताव तयार करून तो तातडीने महाराष्ट्र सरकारकडे पाठवण्याचा आदेश दिला त्यामुळे बऱ्याच वर्षांपासून रखडलेले संगमवाडी येथील क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचा विषय लवकरच मार्गी लागेल असा विश्वास नगरसेवक सुभाष जगताप यांनी व्यक्त केला .

