‘स्वदेशातून विदेशाकडे’ संकल्पनेवर विद्यार्थ्यांनी बनविलेल्या १००० हून अधिक वस्तूंच्या हस्तकलेचे प्रदर्शन

Date:

खादी संकल्पनेवरील नवव्या ‘स्पार्क’ वार्षिक प्रदर्शनाचे
सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीतर्फे आयोजन
पुणे : सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संचालित सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या (एसआयएफटी) खादीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘स्वदेशाकडून विदेशाकडे’ या संकल्पनेवर आधारित ‘स्पार्क २०२०’ या हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून खादीवर आधारित विविध वस्तूंचे प्रदर्शन आयोजिले आहे. बावधन येथील ‘सूर्यदत्ता’च्या कॅम्पसमध्ये दि. ९ ते ११ फेब्रुवारी २०२० या कालावधीत हे प्रदर्शन भरणार असून, शनिवारी (८ फेब्रुवारी) सायंकाळी ५ वाजता या प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे. हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे, अशी माहिती ‘एसआयएफटी’च्या संचालिका प्रा. रेणुका घोसपुरकर यांनी दिली आहे.
प्रा. रेणुका घोसपुरकर म्हणाल्या, “संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली फॅशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमांतर्गत बनवलेल्या नाविन्यपूर्ण वस्तूंच्या प्रदर्शनाचे दरवर्षी आयोजन केले जाते. महात्मा गांधीजींची १५० वी जयंती असल्याने ‘एसआयएफटी’च्या विद्यार्थ्यांनी यावर्षी खादीचा प्रचार आणि प्रसार व्हावा, तसेच खादीचे महत्व सर्वांपर्यंत पोहचावे यासाठी खादी संकल्पनेवर आधारित विविध वस्तू तयार केल्या आहेत. गांधीजींना अभिवादन करण्यासाठी प्रदर्शनस्थळी महात्मा गांधी चरख्यावर सूत कातत असतानाची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. जवळपास १००० वस्तू या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. या वस्तू माफक दरामध्ये खरेदी करता येणार आहेत. देशभरात तसेच जागतिक स्तरावर खादीच्या कपड्यांचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने हाताने तयार केलेल्या आणि हाताने विणलेल्या कपड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सूर्यदत्तानी पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांनी या वस्तू बनवताना पर्यावरणपूरकतेलाही प्राधान्य दिले आहे. अनेक छोट्या तुकड्याचा पुनर्वापर करून लक्षवेधक वस्तू बनवल्या आहेत.” खादी हे फक्त कापड नसून, तो एक विचार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हा विचार आपल्या आचरणात आणावा. खादीमधील सूताप्रमाणे पर्यावरण, व्यवस्था आणि समाजातील धागे विणून राष्ट्राची बांधणी करण्यात युवकांनी योगदान द्यावे, हा या प्रदर्शनाच्या आयोजनामागील उद्देश आहे.
डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांत महात्मा गांधींनी खादीची चळवळ राबवली. त्यातून विदेश वस्तूंच्या वापराबाबत बहिष्कार घातला आणि स्वदेशी वस्तुंना, तसेच स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन दिले. गावातील छोट्या व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी, तसेच महागड्या विदेशी कपड्यांवर बहिष्कार घालण्यासाठी ही चळवळ उपयुक्त ठरली होती. ब्रिटिशांच्या विरोधात महात्मा गांधीजींनी खादी आणि असहकार चळवळ यशस्वीपणे राबवली. त्यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा खादीला प्रोत्साहन देऊन स्वदेशी वस्तूंचा वापर वाढावा, तसेच स्थानिक कलाकार, कारागीर आणि उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन महत्वाचे ठरणार आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजविण्याचा, थोर व्यक्ती, स्वातंत्र्यसेनानी यांची ओळख करून देण्यासाठी हा एक अनोखा उपक्रम राबविला जात आहे. डिझाइन उद्योगात भविष्यात नेतृत्व करण्यासाठी फॅशन डिझायनर्सची एक प्रतिभावान कार्यक्षम विदयार्थी तयार करण्यासाठी ‘एसआयएफटी’च्या वतीने या प्रदर्शनाच्या माध्यमातून संधी दिली जाते. ‘एसआयएफटी’मध्ये विद्यार्थ्यांना व्यावसायिक आणि फॅशन डिझाईन प्रशिक्षणासाठी उत्कृष्ट सुविधा पुरवते. फॅशन टेक्नॉलॉजीचे अभ्यासक्रमात फॅशनच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये ज्ञान आणि व्यावहारिक प्रदर्शनाचे उद्दीष्ट ठेऊन विद्यर्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. तसेच त्यांना रोजगाराच्या विविध संधी देखील देण्यात येतात. विद्यर्थ्यांना या विषयातील संपूर्ण ज्ञान मिळावे यासाठी फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात डिप्लोमा, पदवी आणि अल्प कालावधीचे अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असून, अधिकाधिक लोकांनी त्याचा लाभ घ्यावा.”
सुर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एसआयएफटी) विषयी :
शिक्षण क्षेत्रात काळानुरुप होत असलेले बदल आणि त्याची गरज लक्षात घेऊन सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये त्यानुसार नाविण्यपूर्ण, उपयुक्त शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो. झपाट्याने विकसित होत असलेल्या भारतात फॅशन जगतात आज सर्जनशील नोकर्‍यांची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. या संधींचा लाभ उठविण्यासाठी आणि नव्या पर्यायांकडे वळण्यासाठी सुर्यदत्ता ग्रुपमध्ये संशोधनासाठी नेहमीच प्रोत्साहित केले जाते. त्यांच्यामध्ये मानवता, स्वातंत्र्य, प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि संवेदनशील भावनेने काम करण्यास प्रवृत्त केले जाते. नवीन कल्पना आणि उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याचे काम संस्थेत होते. सगळ्यांचा आदर ठेवला जातो. फॅशन क्षेत्रातील विविध करिअरच्या संधी ओळखून त्यानुसार इथे मुलांना शिकवले जाते. ‘एसआयएफटी’ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित असून, पदवी आणि विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. बीएस्सी (फॅशन डिझाईन) ही पदवी लक्झरी इन मॅनेजमेंट अ‍ॅन्ड फॅशन मॅनेजमेंट या प्रमाणपत्रासह दिली जाते.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सत्तेच्या लोभी राजकारणाला आम आदमी पार्टी शह देईल..अरविंद केजरीवाल,भगवंत मान पुण्यात प्रचाराला येणार

पुणे- ' महाराष्ट्रात प्रस्थापित राजकीय पक्षांनी विचारधारा सोडून सामान्य...

प्रशांत जगतापांच्या राजीनाम्याचे वृत्त बदमाशीचे ..खोडसाळ

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप...

प्राजक्ता पटवर्धन यांना भाऊसाहेब स्मृती पाटणकर स्मृती पुरस्कार

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे रविवारी गौरव पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे मराठीतील आद्य...

अडचणींना सामोरे जात फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घ्या : गजाला शेख

गजाला शेख लिखित ‘द फिनिक्स पाथ’ पुस्तकाचे प्रकाशन पुणे :...