- ऑक्टोबर 2019 मध्ये ओलांडला 31 दशलक्ष व्यवहारांचा टप्पा
- निर्मितीपासून आतापर्यंत 6 दशलक्षहून अधिक फास्टॅग जारी
- सध्या 23 सदस्य बँका फास्टॅग जारी करतात
- भारतातील 528+ टोल प्लाझांवर फास्टॅगचा वापर
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) ऑक्टोबर 2019 मध्ये नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (एनईटीसी) कार्यक्रमांतर्गत केलेल्या व्यवहारांचा 31 दशलक्षचा टप्पा ओलांडला असल्याचे जाहीर केले आहे.
फास्टॅग हा वापरण्यास सोपा, रीलोडेबल असणारा टॅग वाहनाच्या विंडस्क्रीनवर लावला जातो. गाडी जात असताना, या टॅगशी जोडलेल्या प्रीपेड किंवा बचत खात्यातून टोलचे शुल्क आपोआप वजा केले जाते. युजरना त्यांच्या टॅग खात्यामध्ये करण्यात आलेल्या सर्व व्यवहारांचा एसएमएस अलर्ट त्यांच्या नोंदणीकृत मोबाइलवर क्रमांकावर येतो. फास्टॅग असणाऱ्या वाहनांना रोख व्यवहार करण्यासाठी टोल प्लाझावर थांबावे लागत नाही. यामुळे त्यांचा वेळ व इंधन वाचते.
ऑक्टोबर 2019 मध्ये, फास्टॅगच्या व्यवहारांची संख्या 31.46 दशलक्ष होती आणि व्यवहारांचे मूल्य 702.86 कोटी रुपये होते, या तुलनेत सप्टेंबर 2019 मध्ये व्यवहारांची संख्या 29.01 दशलक्ष होती आणि व्यवहारांचे मूल्य 658.94 कोटी रुपये होते.
एनपीसीआयच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर प्रवीणा राय यांनी सांगितले, “आम्ही प्रामुख्याने फास्टॅगवर भर देत आहोत आणि 2 वर्षांपेक्षाही कमी कालावधीमध्ये फास्टॅग खऱ्या अर्थाने इंटरऑपरेबल झाले आहे. आज, फास्टॅग जारी करणाऱ्या 23 सदस्य बँका आहेत आणि फास्टॅग व्यवहार संपादित करणाऱ्या 10 सदस्य बँका आहेत (टोल प्लाझावर स्वीकारण्यासाठी पाठिंबा देतात). आज, फास्टॅग राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील 528+ टोल प्लाझांवर कार्यरत आहे. फास्टॅग राज्य महामार्ग व शहरातील टोल प्लाझा येथेही प्रवेश करत आहे आणि शहरातील स्थानिक रहिवाशांना डिजिटल पद्धतीने टोल भरण्याची सुविधा देत आहे.”
डिसेंबर 1, 2017 पासून, सर्व नव्या कारमध्ये प्री-अॅक्टिवेटेड फास्टॅग असणार आहेत. फास्टॅग निवडक टोल प्लाझा, निवडक बँक शाखा, रिटेल पीओएस ठिकाणे / इश्यूअर बँक वेबसाइट / माय फास्टॅग अॅप येथे व ई-कॉमर्सद्वारे ऑनलाइन खरेदी करता येऊ शकतात.
ग्राहकाला वाहनाच्या विंडस्क्रिनवर फास्टॅग लावून त्याचा वापर सुरू करता येऊ शकतो. ग्राहक आपले वाहन घेऊन ज्या ज्या टोल प्लाझावरून जाईल, तेथे फास्टॅगशी लिंक केलेल्या वॉलेटमधून टोलची रक्कम आपोआप वजा केली जाईल. क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड / एनईएफटी/आरटीजीएस/यूपीआय किंवा नेट बँकिंग याद्वारे हा टॅग ऑनलाइन टॉप-अप करता येऊ शकतो.
फास्टॅग लवकरच पेट्रोल पंपांवर उपलब्ध होणार आहे आणि त्यानंतर त्यांचा वापर पेट्रोल खरेदी करण्यासाठी व पार्किंग शुल्क भरण्यासाठी केला जाऊ शकतो.
देशात सर्वत्र डिसेंबर 1, 2019 पासून राष्ट्रीय महामार्गावर फास्टॅग बंधनकारक असणार आहे.