पुणे-एसबीआय लाइफ इन्शुरन्स या भारतातील एका आघाडीच्या लाइफ इन्शुरन्स कंपनीने जून 30, 2018 पर्यंतच्या तिमाहीतील 2,076 कोटी रुपयांच्या तुलनेत जून 30, 2019 पर्यंतच्या तिमाहीत न्यू बिझनेस प्रीमिअममध्ये 52% म्हणजे 3,154 कोटी रुपयांपर्यंत उत्तम वाढ साध्य केली आहे.
संरक्षण यावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करत, जून 30, 2019 पर्यंतच्या तिमाहीत एसबीआय लाइफच्या प्रोटेक्शन न्यू बिझनेस प्रीमिअमचे 436 कोटी रुपये संकलन झाले. जून 30, 2018 पर्यंतच्या तिमाहीतील 212 कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात 106% वाढ झाली. इंडिव्हिज्युअल न्यू बिझनेस प्रीमिअम संकलनामध्ये 41% म्हणजे, 1,326 कोटी रुपयांवरून 1,872 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली.
जून 30, 2019 पर्यंत, करोत्तर नफ्यामध्ये 5% म्हणजे 372 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत हे प्रमाण 354 कोटी रुपये होते.
जून 30, 2019 पर्यंत, कंपनीचा सॉल्व्हन्सी रेश्यो 1.50 च्या तुलनेत 2.17 इतका उत्तम राहिला.
एसीबआय लाइफच्या एयूएममध्ये जून 30, 2019 पर्यंत 22% म्हणजे 1,46,954 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली. जून 30, 2018 पर्यंत हे प्रमाण 1,20,279 कोटी रुपये होते, तसेच डेट्-इक्विटी प्रमाण 77:23 होते. 90% डेट् गुंतवणूक AAA व सोव्हिरिअन साधनांमध्ये आहे.
कंपनीचे 174,753 प्रशिक्षित इन्शुरन्स प्रोफेशनलचे वितरण जाळे आहे आणि कंपनीची देशभर 922 कार्यालये असून त्यामध्ये बँकाश्युरन्स चॅनल, एजन्सी चॅनल आणि कॉर्पोरेट एजंट, ब्रोकर, मायक्रो एजंट कॉमन सर्व्हिस सेंटर्स, इन्शुरन्स मार्केटिंग फॉर्म, वेब अग्रीगेटर्स व डायरेक्ट बिझनेस अशी अन्य चॅनल यांचा समावेश आहे.
जून 30, 2019 पर्यंतच्या तिमाहीतील कामगिरी
- न्यू बिझनेस प्रीमिअममध्ये 52% वाढ
- संरक्षणाचा हिस्सा 10% वरून 14% पर्यंत 106% वाढला
- 35% वार्षिक वाढीने इंडिव्हिज्युअल रेटेड प्रीमिअममध्ये (आयआरपी) खासगी क्षेत्रात आघाडी
- ऑपरेटिंग एक्स्पेन्स रेश्योमध्ये 9.7% वरून 7.4% पर्यंत घट
- 13व्या महिन्यातील पर्सिस्टन्सी रेश्योमध्ये 82.47% वरून 84.46% पर्यंत 200 बीपीएस वाढ
- करोत्तर नफ्यामध्ये 5% म्हणजे 372 कोटी रुपयांपर्यंत वाढ
- व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेसमध्ये (व्हीओएनबी) 49% म्हणजे 371 कोटी रुपयांपर्यंत वाढ
- व्हीओएनबी मार्जिन 19.0% वरून 19.9% पर्यंत वाढले