· दळणवळण उपयोजनात लास्ट माईल आणि मिड माईल सुविधा पुरविण्यासाठी वजनाने हलक्या इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांच्या leV मालिकेतील संकल्पनाप्रणीत वाहनांची नवीन श्रेणी आणि विशेष अॅप्लिकेशन्सची श्रेणी पुरवणाऱ्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक बसेसची श्रेणी यांचे स्विच तर्फे अनावरण
· स्विच ग्रेटर नोएडा येथील एक्स्पो ग्राउंड्स मध्ये हॉल क्रमांक १२ स्टॉल क्रमांक एन १५ मध्ये अशोक लेलँडसह एकात्मिक स्टँडचा भाग असेल.
चेन्नई ०५ जानेवारी २०२३ : अत्याधुनिक कार्बन न्यूट्रल इलेक्ट्रिक बस आणि वजनाने हलकी व्यावसायिक वाहने बनविणारी कंपनी स्विच मोबिलिटी लिमिटेड (‘SWITCH’) जागतिक बाजारपेठेसमोर आपली बाजारपेठेतील आघाडीची उत्पादने आणि तंत्रज्ञान सादर करण्यासाठी ग्रेटर नोएडा येथील ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये उपस्थित राहणार आहे. स्विच मोबिलिटी १३-१८ जानेवारी २०२३ दरम्यान हॉल क्रमांक १२ स्टॉल क्रमांक एन १५ मध्ये प्रख्यात ऑटो एक्स्पोमध्ये प्रथमच सहभागी होत असून दळणवळण उपयोजनात लास्ट माईल आणि मिड माईल सुविधा पुरविण्यासाठी वजनाने हलक्या इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांच्या leV मालिकेतील संकल्पनाप्रणीत वाहनांची नवीन श्रेणी आणि EiV मालिकेतील इलेक्ट्रिक बसेसची नवीन श्रेणी यांचे अनावरण करणार आहे. एक्स्पोमध्ये इलेक्ट्रिक बस लाइन-अप बळकट करणे हे भारतातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर स्विच EiV 22 चे ओपन टॉप व्हेरिएंट देखील असेल. स्विचच्या जागतिक इलेक्ट्रिक बस अनुभवाचा उपयोग करून भारतात डिझाइन केलेली, विकसित आणि उत्पादित केलेली स्विच EiV 22 नवीनतम तंत्रज्ञान, अत्याधुनिक डिझाइन, सर्वोच्च सुरक्षितता आणि सर्वोत्तम आरामदायी वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.
स्विच मोबिलिटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बाबू म्हणाले, ” वेगाने वाढणाऱ्या दळणवळण क्षेत्रामध्ये परिवर्तन करण्यासाठी अत्याधुनिक उत्पादने आणि तंत्रज्ञानाद्वारे शून्य कार्बन वाहतुकीचे सार्वत्रिकरण करण्यासाठी स्विच कटिबद्ध आहे. ग्राहक आणि भागीदारांशी जोडले जाण्यासाठी भविष्यकालीन तंत्रज्ञानाने युक्त उत्पादने सादर करण्यासाठी कंपन्यांकरिता ऑटो एक्स्पो हे एक आदर्श व्यासपीठ आहे. या उद्योगातील सर्वोत्कृष्ट नवकल्पना सादर करण्यासाठी, समजून घेण्यासाठी ४ वर्षांनंतर आपण एकत्र येत असल्याने स्विच सर्व-नवीन IeV मालिका आणि EiV मालिकेच्या नाविन्यपूर्ण संकल्पना आणि प्रकार प्रदर्शित करणार असून अतुलनीय प्रवासी आराम आणि सुविधेसह सर्वोत्तम मूल्य प्रस्ताव देत आहे. ग्राहकांनी दिलेली सखोल माहिती आणि देशाच्या भविष्यातील दळणवळणाच्या गरजांवर आधारित ही उत्पादने तयार केली गेली आहेत.”
एप्रिल २०२१ मध्ये स्थापना झाल्यापासून स्विच मोबिलिटीने जगभरात ५५ दशलक्ष इलेक्ट्रिक किलोमीटर्सचा टप्पा पार करून लक्षणीय प्रगती केली आहे. हरित दळणवळणाद्वारे, सर्वांसाठी योग्य स्वच्छ, स्मार्ट प्रवास सुविधा पुरवत जीवन समृद्ध करणे या आपल्या ध्येयाच्या समर्थनार्थ महत्त्वाचे धोरणात्मक मैलाचे दगड पार करत आहे.